Ration Card Link To Aadhaar Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card Link To Aadhaar: रेशन आणि आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारने..!

Manish Jadhav

Ration Card Link to Aadhaar: रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होणार आहे.

रेशनकार्डशी (Ration Card) आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती, मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुमच्याकडे आधारशी रेशन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

खाद्य मंत्रालयाने ही माहिती दिली

याबाबत माहिती देताना खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता आधारशी रेशनकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. एकापेक्षा जास्त रेशकार्डे असणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी सरकारने (Government) ते लिंक करण्याची सुविधा सुरु केली आहे.

फसवणूकीवर आळा घालण्यासाठी...

तुमचे रेशनकार्ड आधारशी लिंक केल्‍यावर ते फसवणूक देखील टाळेल. रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केल्यानंतर यासंबंधी होणारे त्रास टाळता येऊ शकतात.

ऑनलाइन लिंक कशी बनवायची-

>> सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाइटवर जा (प्रत्येक राज्याचे स्वतःचे PDS पोर्टल आहे).

>> तुमच्या सध्याच्या कार्डशी आधार लिंक करण्याचा पर्याय निवडा.

>> त्या क्रमाने तुमचे रेशनकार्ड, आधारकार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर टाका.

>> 'continue/submit' चा पर्याय निवडा.

>> तुमच्या फोनवर एक OTP येईल, तो टाका.

>> प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस पाठवला जाईल.

निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रेशन घेता येणार नाही

दुसरीकडे, जर तुम्ही तुमचे रेशनकार्ड आधारशी लिंक केले, तर त्यानंतर कोणतीही व्यक्ती निश्चित कोट्यापेक्षा जास्त रेशन घेऊ शकणार नाही. यातूनच गरजूंना अनुदानावर धान्य मिळू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT