Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांनो सावधान! 'या' चुका कधीही करु नका; अन्यथा तुम्ही...

Free Ration Holders: केंद्र सरकारने कोरोना काळात सुरु केलेली मोफत रेशन योजना अजूनही सुरुच आहे.
Ration Card
Ration CardDainik Gomantak
Published on
Updated on

Free Ration Holders: केंद्र सरकारने कोरोना काळात सुरु केलेली मोफत रेशन योजना अजूनही सुरुच आहे. योजनेतर्गंत पात्र कार्डधारकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळेल. देशभरातील सुमारे 80 कोटी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.

कुटुंबातील प्रत्येक सदस्यानुसार रेशन दिले जाते. मात्र, मोफत रेशन योजनेच्या काळात फसवणूक करणारे लोकांची फसवणूक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

नाव वगळण्याच्या बहाण्याने

दरम्यान, रेशनकार्डची (Ration Card) यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाते. अशा स्थितीत अनेकांची नावे जोडली जातात आणि अनेकांची नावे वगळली जातात. मात्र, याचाच फायदा घोटाळेबाज घेतात आणि लोकांची फसवणूक करतात.

सरकारही याबाबत सतत सूचना देत असते. ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा लोकांना फसवणूक करणारे कॉल करतात आणि त्यांची नावे जोडण्यासाठी आपल्या सूचनांचे पालन करण्यास सांगतात. अशा फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Ration Card
Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांना मोठा झटका! मोदी सरकारने स्वस्त गहू आणि तांदूळ विक्रीवर घातली बंदी

रेशनचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील

जर तुम्हाला तुमच्या खात्यात मोफत रेशनचे पैसे मिळावेत असा मेसेज आला आणि त्या लिंकवर क्लिक करा असे सांगण्यात आले असेल तर त्या लिंकवर कधीही क्लिक करु नका.

त्या लिंकवर क्लिक करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही फसवणुकीचे बळी ठरु शकता. सध्या सरकार (Government) अशी कोणतीही योजना चालवत नाही. अशा फेक मेसेजमुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.

केवायसी अपडेटचे निमित्त

दुसरीकडे, फसवणूक करणारे नवनवीन पद्धती वापरत आहेत. मोफत रेशन घेणार्‍यांना फोन करुन ते लोकांना त्यांचे केवायसी अपडेट करण्यास सांगून फसवतात. तुम्हाला असा कोणताही कॉल आल्यास कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती देऊ नका.

Ration Card
Ration Card: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जून तारीख नोंद करुन ठेवा; नाहीतर...

मोफत रेशन मिळवण्याचे आमिष दाखवले जात आहे

जर तुम्हाला अशी लिंक आली असेल ज्यामध्ये तुम्हाला अधिक मोफत रेशन मिळवण्याचे आमिष दाखवले जात आहे. पण त्याचवेळी अतिरिक्त मोफत रेशनसाठी या लिंकवर क्लिक करा, असेही सांगितले जात आहे. चुकूनही हे करु नका कारण या बनावट लिंक्स आहेत. बनावट लिंकवर क्लिक करुन तुम्ही फसवणुकीचे बळी ठरु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com