Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली मोठी घोषणा

Millet on Ration Card: तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारी खाद्यान्य योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Rules: तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारी खाद्यान्य योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. होय, हवामानातील बदलामुळे हरियाणाच्या अन्न आणि पुरवठा विभागाने ग्राहकांच्या राशनमध्ये बदल केला आहे. हिवाळी हंगाम सुरु झाल्याने विभागाकडून गव्हासह बाजरी ग्राहकांना वितरित केली जात आहे. यासाठी हरियाणाच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.

पूर्वी कार्डधारकांना गहू मिळत असे

याआधी हरियाणा (Haryana) राज्यातील सर्व डेपोवर कार्डधारकांना गहू वितरित केला जात होता. मात्र हिवाळा सुरु झाल्याने ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेऊन सरकारने बाजरी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, हिवाळ्यात बाजरीचे सेवन फायदेशीर ठरते. आता 1 नोव्हेंबरपासून सर्व कार्डधारकांना सरकारकडून (Government) बाजरी वितरित केली जाणार आहे.

बाजरीचे वितरण

गुलाबी कार्डधारकांना शासनाकडून 18 किलो गहू आणि 17 किलो बाजरी दिली जाणार आहे. याशिवाय पिवळे आणि खाकी शिधापत्रिकाधारकांना प्रति युनिट 2.5 किलो गहू आणि 2. 5 किलो बाजरी वाटप करण्याची तरतूद आहे. याशिवाय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY) अंतर्गत, कार्डधारकांना स्वतंत्रपणे गहू मोफत मिळेल. 1 नोव्हेंबर 2022 पासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये राशनचे वितरण सुरु होणार आहे. त्यासाठीची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT