Rekha Jhunjhunwala Dainik Gomantak
अर्थविश्व

Rekha Jhunjhunwala: एका दिवसात गमावले 800 कोटी; रेखा झुनझुनवालांना कोणत्या कंपनीमुळे बसला फटका

Rekha Jhunjhunwala: टायटन कंपनीच्या मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचे निकाल सोमवारी (6 मे 2024) जाहीर झाले आहेत.

Manish Jadhav

Rekha Jhunjhunwala: टायटन कंपनीच्या मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचे निकाल सोमवारी (6 मे 2024) जाहीर झाले. त्रैमासिक निकाल जाहीर होताच, कंपनीचे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांनी घसरले, ज्यामुळे दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना सुमारे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 31 मार्च 2024 पर्यंत टाटा समूहाच्या या कंपनीत 5.35 टक्के हिस्सा होता, ज्याचा भाव शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत 16,792 कोटी रुपये होता.

रेखा झुनझुनवाला यांचे 805 कोटींचे नुकसान

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टायटनचे मार्केट कॅप सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये 3 लाख कोटी रुपयांच्या खाली घसरुन 2,98,815 कोटी रुपयांवर आले, जे शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत 3,13,868 कोटी रुपये होते. मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण नोंदवल्याने रेखा झुनझुनवाला यांचे अंदाजे गुंतवणूक मूल्य आता 805 कोटी रुपयांनी कमी होऊन 15,986 कोटी रुपये झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायटनचा बिग बुल शेअर (Share) राकेश झुनझुनवाला यांचा सर्वात आवडता शेअर होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. त्यामुळे कंपनीच्या ज्वेलरी मार्जिनवर सलग दुसऱ्या तिमाहीत दबाव राहिला. त्याचवेळी, Titan ने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत वार्षिक आधारावर 771 कोटी रुपयांच्या एकत्रित नफ्यात 5 टक्के वाढ नोंदवली. या तिमाहीत एकूण उत्पन्न वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून 11,472 कोटी रुपये झाले.

दुसरीकडे, टायटनने 3 मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यावेळी कंपनीचा निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वाढून 786 कोटी रुपये झाला. मात्र, तो ब्रोकरेजच्या अंदाजापेक्षा खूपच कमी होता. टायटनचा नफा वार्षिक आधारावर 10 टक्क्यांहून अधिक वाढेल आणि 800 कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असा विश्वास अनेक ब्रोकरेजना होता. यामुळेच अपेक्षेपेक्षा कमजोर निकालामुळे कंपनीचे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांनी घसरले आहेत.

तसेच, अपेक्षेपेक्षा कमजोर तिमाही निकाल असूनही ब्रोकरेजने टायटनची टार्गेट प्राइस वाढवली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने टायटनवर बाय रेटिंग कायम ठेवले आहे. त्यांनी 4,100 रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. त्याचवेळी, जागतिक ब्रोकरेज हाऊस जेफरीजने टायटनच्या गुंतवणूकदारांना 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला. टायटनसाठी त्याची टार्गेट प्राइस 3,500 रुपये आहे. नामांकित ब्रोकरेज गोल्डमन सॅक्सने टायटनला बाय रेटिंग दिले आहे. टार्गेट प्राइस 3,950 रुपये ठेवण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस UBS ने देखील टायटनसाठी 3,900 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. त्यांनी कंपनीच्या शेअर्सचे रेटिंग ‘न्यूट्रल’ ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT