Tata Group: टाटा समूहात नोकरीची संधी; 72,000 जणांना मिळणार रोजगार

Tata Group Will Provide Jobs To 72 000 People: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा समूह 72,000 लोकांना रोजगार देणार आहे.
Tata Group Chairman Chandrasekaran
Tata Group Chairman Chandrasekaran Dainik Gomantak

Tata Group Will Provide Jobs To 72 000 People:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा समूह 72,000 लोकांना रोजगार देणार आहे. बुधवारी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ढोलेरा, गुजरात येथे 91,000 कोटी रुपयांच्या चिप उत्पादन प्रकल्पाच्या आणि आसाममध्ये 27,000 कोटी रुपयांच्या चिप असेंब्ली युनिटच्या प्रस्तावित पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

चंद्रशेखरन म्हणाले की, ''आम्ही आगामी वर्षांची वाट पाहत आहोत. अंदाजे 72,000 नोकऱ्या निर्माण होतील. एवढेच नाही तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे सेमीकंडक्टर प्लांट हळूहळू चिप्स पुरवतील आणि टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रांना सेवा देतील. भविष्यात या प्रकल्पांचा विस्तारही केला जाईल पण हे सुरुवातीचे टप्पे पार केल्यानंतरच होईल.''

मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील

चंद्रशेखरन म्हणाले की, ''हे प्लांट्स सुरु होताच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माणा होतील. ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात त्याचा विस्तार होईल. गुजरातमधील प्लांटमध्ये 50,000 नोकऱ्या आणि आसाममधील प्लांटमध्ये 20,000-22,000 नोकऱ्या निर्माणा होतील. परंतु याला वेळ लागेल. आम्ही सुरुवातीचे टप्पे पार करत असताना विस्तार करु.''

चंद्रशेखरन पुढे म्हणाले की, ''हे प्लांट्स लवकरात लवकर सुरु करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. ते पुढे म्हणाले की, “साधारणपणे सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी सुमारे चार वर्षे लागतात. कॅलेंडर वर्ष 2026 च्या उत्तरार्धात चिपचे उत्पादन सुरु करण्याचे आमचे ध्येय आहे. आसाममध्ये हे काम याआगोदरही होऊ शकते. 2025 च्या अखेरीस आम्ही आसाममध्ये (Assam) व्यावसायिक उत्पादन सुरु करु शकतो.''

Tata Group Chairman Chandrasekaran
Tata Group: बस नाम ही काफी है! टाटा समूहाचं मार्केट कॅप पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक

चिप उत्पादनात आपण स्वावलंबी होऊ

ते पुढे म्हणाले की, ''टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्लांटमध्ये उत्पादित चिप्स ऑटोमोटिव्ह, पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक आणि वैद्यकीय यासह विविध क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करतील.'' टाटा समूहाचे प्रमुख चंद्रशेखरन म्हणाले की, ''चिप्सची गरज असलेल्या क्षेत्रांची संपूर्ण श्रेणी आहे. पण आम्ही पहिल्या दिवसापासून सर्व प्रकारच्या चिप्स तयार करु शकत नाही. हे टप्प्याटप्प्याने होईल पण आम्ही सर्व क्षेत्रांना सेवा देऊ.'' ते शेवटी म्हणाले की, ''टाटाचा चिप प्लांट 28 नॅनोमीटर (nm) ते 110 नॅनोमीटर नोड्समध्ये चिप्स तयार करण्यास सक्षम आहे. स्मार्टफोन (Smartphone), टॅब्लेट सारख्या उच्च-तंत्रज्ञान उपकरणांना प्रामुख्याने 3nm, 7nm आणि 14nm सारख्या लहान नोड्ससह चिप्सची आवश्यकता असते.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com