Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: मोफत राशन घेणार्‍यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली मोठी घोषणा

Manish Jadhav

Ration Card Holders Benefit: वेगवेगळ्या राज्य सरकारकडून त्यांच्या राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी सातत्याने मोठी पावले उचलली जात आहेत. याच क्रमाने, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गरीब कुटुंबांसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षी 'चिरंजीवी योजने' या आरोग्य विमा योजनेत विमा संरक्षण 25 लाख रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे.

यापूर्वी, या विमा संरक्षणाची रक्कम 10 लाख रुपये होती, ती सरकारने अडीच पट वाढवली आहे. याबाबतची घोषणा शुक्रवारी सरकारने केली.

मेडिकल कव्हरच्या अडीच पट रक्कम

मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्य विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना ही मोठी घोषणा केली. गेहलोत म्हणाले की, या योजनेचा लाभ आता दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) कुटुंबातील सदस्यांना उपलब्ध होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, चिरंजीवी आरोग्य विमा योजनेंतर्गत, आम्ही पुढील आर्थिक वर्षापासून प्रति कुटुंब विमा संरक्षण रक्कम 10 लाख रुपयांवरुन 25 लाख रुपये करण्याची घोषणा करत आहोत.

अपघाती विमा संरक्षण 5 लाखांवरुन 10 लाखांपर्यंत वाढले आहे

गेहलोत म्हणाले की, 'आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) कुटुंबांनाही या योजनेचा मोफत लाभ मिळणार आहे.' या योजनेंतर्गत अपघात विम्याची रक्कम 5 लाखांवरुन 10 लाख रुपये करण्याची घोषणाही गेहलोत यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यातील मंडळे आणि महामंडळांच्या कर्मचाऱ्यांसाठी (Employees) जुनी पेन्शन योजना (OPS) बहाल करण्याची घोषणा केली. राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच जुनी पेन्शन बहाल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT