Radio Jockey to Gossip Queen! 'Missmalini' earns crores of rupees from Bollywood Gossips. Dainik Gomantak
अर्थविश्व

रेडिओ जॉकी ते गॉसिप क्वीन! बॉलिवूडमधील चर्चेतून 'मिस मालिनी' कमावते करोडो रुपये

Bollywood Gossips: मिस मालिनीवर वेबसाइटवर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींचे पर्सनल लाइफचे फोटो प्रसिद्ध होतात. विमानतळावर कोणी कसे कपडे घातले किंवा पार्टीत काय गप्पाटप्पा झाल्या यासारखे विषय त्यांच्या साइटवर प्रकाशित केले जातात.

Ashutosh Masgaunde

Radio Jockey to Gossip Queen! 'Missmalini' earns crores of rupees from Bollywood Gossips: मालिनी अग्रवाल 'मिसमालिनी' एंटरटेनमेंटच्या संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. त्या मिसमालिनी या टोपणनावाने प्रसिद्ध असून डिजिटल इनफ्लुएन्सर, टीव्ही होस्ट, उद्योजक आणि लेखिका आहेत.

त्यांची वेबसाइट MissMalini.com ची स्थापना 2008 मध्ये झाली. यावर बॉलीवूडमधील गॉसिपवर बातम्या प्रसिद्ध होतात. मालिनी यांनी टू द मून: हाऊ आय ब्लॉग्ड माय वे टू बॉलीवूड नावाचे पुस्तक लिहिले आहे.

मालिनी यांची पार्श्वभूमी

मालिनी अग्रवाल यांचा जन्म २६ मे १९७७ रोजी भारतातील प्रयागराज येथे झाला. तिचे आई-वडील भारतीय परराष्ट्र सेवेत काम करत होते, त्यामुळे मालिनी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या देशांमध्ये वाढली.

मालिनी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मैत्रेयी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि काही स्वप्ने घेऊन वयाच्या 21 व्या वर्षी मुंबईला आली.

अशी सुरू झाली कारकिर्द

मालिनी यांनी रेडिओ जॉकी म्हणून मुंबईतील WIN 94.6 रेडिओ मध्ये करिअरची सुरुवात केली, जो नंतर Radio One 94.3 झाला.

त्यांनी होस्ट केलेल्या काही शोमध्ये हॉर्न ओके प्लीज, 225, टायगर टाइम विथ मालिनी, ओव्हरड्राईव्ह आणि मालिनी मिडनाईट टॉक यांचा समावेश होता.

मालिनी यांनी डिजिटल टीव्हीवर येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी चॅनल V इंडियासाठी प्रोग्रामिंग डायरेक्टर म्हणून काम केले.

आज, मालिनी यांची कंपनी मनोरंजन क्षेत्रातील प्रचंड कमाई करुन देणारी संस्था आहे. त्या मिसमालिनी एंटरटेनमेंट या तिच्या कंपनीची संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. त्याशिवाय, ती एक डिजिटल इन्फ्लुएन्सर, टीव्ही होस्ट, एक उद्योजक आणि लेखिका देखील आहे.

अशी सुरू झाली MissMalini.com

MissMalini.com ची स्थापना मालिनी अग्रवाल यांनी 2008 मध्ये ब्लॉग लिहिण्याचा छंद म्हणून केली होती. तिचा वाचक हळूहळू वाढत गेल्याने तिने पूर्णवेळ ब्लॉगिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चॅनल V सोडण्याचा निर्णय घेतला.

MissMalini.com पॅरिसहिल्टन आणि पॉपसुगर सारख्या आंतरराष्ट्रीय वेबसाइट्सना आपली प्रेरणा मानते. ज्यामध्ये बॉलिवूड आणि सेलिब्रिटी जीवनातील सर्व पैलू समाविष्ट आहेत. यावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन ट्रेंडमधील नव्या नव्या गोष्टी तसेच प्रवास, खाद्यपदार्थ आणि नाइटलाइफ यासारख्या जीवनशैलीशी संबंधीत कन्टेट प्रकाशित केला जा

करोडोंमध्ये कमाई

मालिनी त्यांच्या ब्लॉगवरून दर महिन्याला सुमारे 20 लाख रुपये कमावतात. म्हणजे वार्षिक २.४२ कोटी रुपये. ही कमाई फक्त गुगल ऍडसेन्स वरून आहे.

याशिवाय मिसमालिनीने Koovs, Myntra आणि Limeroad सारख्या ई-रिटेलिंग वेबसाइट्सशीही टाय-अप केले आहे, ज्यांची कमाई करोडोंमध्ये आहे.

मिस मालिनीचा प्रवास

मिसमालिनी हा एक सतत बदलणारा मनोरंजन माध्यम जीवनशैली ब्रँड आहे जो भारताच्या इंटरनेट जनरेशनसाठी अत्यंत आकर्षक, मल्टी-प्लॅटफॉर्म कन्टेन्ट तयार करतो.

मालिनी ही भारतातील पहिली आणि सर्वात प्रसिद्ध डिजिटल इन्फ्लुएन्सर आहे, जिने 2008 मध्ये तिच्या वेबसाइट MissMalini.com द्वारे भारतीय जीवनशैली ब्लॉगिंगचा पाया रचला.

आज MissMalini Entertainment चा कन्टेन्ट त्यांच्या मालकीच्या चॅनेलवर दरमहा 30 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचतो.

ब्लॉग ट्रेंड बनतात

मिस मालिनीवर वेबसाइटवर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींचे पर्सनल लाइफचे फोटो प्रसिद्ध होतात. विमानतळावर कोणी कसे कपडे घातले किंवा पार्टीत काय गप्पाटप्पा झाल्या यासारखे विषय त्यांच्या साइटवर प्रकाशित केले जातात.

मालिनी यांनी प्रियांका चोप्राचा विमानतळावर काढलेला फोटो तिच्या ब्लॉगवर पोस्ट केला होता. फोटोमध्ये प्रियांकाने साधा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. मालिनीच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाल्यानंतर तरुणींमध्ये प्रियंकासारखे टी-शर्ट खरेदी करण्याचा ट्रेंड सुरू झाला.

समाजकार्य

मालिनी अग्रवाल यांनी महिलांमध्ये सकारात्मकता, सहानुभूती आणि दयाळूपणा निर्माण करण्यासाठी 2018 मध्ये मालिनी गर्ल ट्राइबची सुरुवात केली. 100 महिलांपासून सुरू झालेला हा समुदाय आता एक असाधारण समुदाय बनला आहे, जो 55 हजारांहून अधिक महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT