Bhagwant Mann
Bhagwant Mann Dainik Gomantak
अर्थविश्व

Punjab Government ने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, जुनी पेन्शन योजना केली बहाल

दैनिक गोमन्तक

Chief Minister Bhagwant Mann: पंजाबच्या भगवंत मान सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन दिली जाणार आहे. हा निर्णय राज्यातील लाखो माजी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. धार्मिक ग्रंथांची ने-आण करणाऱ्या वाहनांना करात सूट देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय, पंजाबमधील (Punjab) तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी भरती नियमांमध्ये बदल करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्याचवेळी मोहालीतील मेडिकल कॉलेजच्या (Medical College) नव्या जागेला मान्यता देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

तसेच, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे हा गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठा मुद्दा बनला होता. काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु केली होती, तर केंद्र सरकारला ती पुनर्स्थापित करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर पुढील वर्षी मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांबाबतही काँग्रेसने आश्वासन दिले आहे की, काँग्रेसचे सरकार आल्यास राजस्थान आणि छत्तीसगडप्रमाणे राज्यातही जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल. त्याचवेळी आम आदमी पक्षाने हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये जुनी पेन्शन बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT