Punjab: ड्रग्जच्या विळख्यात 'पंजाब'! मद्यधुंद तरुणाचा रस्त्यावरच...

Punjab News: पंजाबमधील अमृतसरमध्ये अवैध ड्रग्जच्या नशेत असलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Youth
YouthDainik Gomantak
Published on
Updated on

Punjab News: पंजाबमधील अमृतसरमध्ये अवैध ड्रग्जच्या नशेत असलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातच आता, अमृतसरच्या रस्त्यावर अडखळत असलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातील चमरंग रोड येथे चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद तरुण खाली वाकून रस्त्यावर चालण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर, ऑडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येत आहे की, तो व्यक्ती दारुच्या नशेत असल्याचे दिसत आहे. स्मॅक हे ओपिओइड औषध आहे, ज्याला 'ब्लॅक टार हेरॉईन' देखील म्हणतात.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला, मकबूलपुरा भागात रस्त्यावरुन चालत असताना एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरु करुन तिघांना अटक केली होती. विशेष त्यांच्या ताब्यातून अमली पदार्थही जप्त केले होते. वृत्तानुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला सोडून दिले असून तिला आता अमृतसरमधील (Amritsar) व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Youth
Punjab News: 'मद्यधुंद' असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून उतरवले?

दुसरीकडे, अमली पदार्थांच्या सेवनाच्या समस्येसाठी हा परिसर कुप्रसिद्ध आहे. पोलिसांनी (Police) सुरु केलेल्या अनेक व्यसनमुक्ती मोहिमेचे चांगले परिणाम दिसून आले नाहीत.

Youth
Punjab-Haryana HC: सुसाईड नोटमधील नाव एखाद्याला दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही

तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये 350 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली होती. राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छाप्यादरम्यान 6.90 किलो हेरॉईन, 14.41 किलो अफू, 5 किलो गांजा, 6.44 क्विंटल खसखस ​​आणि 2.10 लाख गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन आणि फार्मा ओपिओइड्स जप्त केल्या आहेत. राज्यभरातील संवेदनशील मार्गांवर वाहनांची झडती घेण्याव्यतिरिक्त, अमली पदार्थ प्रभावित भागात शोध मोहिमेनंतर ₹ 4.81 लाख ड्रग मनी देखील जप्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com