Money Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF Scheme: पीपीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, मार्चमध्ये मिळणार एवढी मोठी रक्कम!

PPF Scheme Latest Update: जर तुम्ही तुमचे PPF खाते देखील उघडले असेल तर 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

Manish Jadhav

PPF Scheme Latest Update: जर तुम्ही तुमचे PPF खाते देखील उघडले असेल तर 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. PPF खातेधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा फायदा मिळणार आहे. 31 मार्चला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत.

यावेळी, तुम्हाला या योजनेत 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. अर्थ मंत्रालयाकडून दरवर्षी व्याजदर निश्चित केले जातात, जे 31 मार्च रोजी खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.

म्हणजेच यावेळी 31 मार्च रोजी सरकारकडून (Government) तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. महिन्याच्या 5 तारखेला व्याजदराचे कॅलकुलेशन केले जाते.

दरम्यान, या योजनेत एक व्यक्ती 500 रुपयांपासून सुरुवात करु शकते. त्याचवेळी, आर्थिक वर्षात, तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक (Investment) करु शकता. इतकंच नाही तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधाही मिळते.

तसेच, तुम्हाला पीपीएफवर कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये मिळणारे व्याज आणि मुदतपूर्ती पूर्ण झाल्यावर मिळणारे पैसे हे तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत.

पीपीएफमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते, परंतु जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्ही ते 6 वर्षानंतरच काढू शकता. PPF खात्यात आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, जी 7 व्या आर्थिक वर्षापासून घेतली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT