Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Pradhan Mantri Mudra Yojana: प्रधानमंत्री मुद्रा योजनेतर्गंत मिळवा 10 लाखापर्यंतचे फायदे, जाणून घ्या

Pradhan Mantri Mudra Yojana: मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ मोठ्याप्रमाणात जनतेला मिळत आहे.

Manish Jadhav

Pradhan Mantri Mudra Yojana: मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ मोठ्याप्रमाणात जनतेला मिळत आहे. यासोबतच पीएम मोदींच्या माध्यमातून एक योजना सुरु झाली आहे, ज्याद्वारे लोक आपला व्यवसाय सुरु करु शकतात. या योजनेचे नाव 'प्रधानमंत्री मुद्रा योजना', असे आहे. या योजनेतर्गंत लाभार्थी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली योजना आहे. या योजनेद्वारे लोकांना विविध श्रेणीनुसार रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. या योजनेंतर्गत लोकांना तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. तिन्ही श्रेणींमध्ये विविध कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.

कर्जाची रक्कम

दरम्यान, 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत लोकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेत लोकांना 'शिशू' अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

याशिवाय 'किशोर' अंतर्गत लोकांना 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. तर 'तरुण' अंतर्गत 5 लाखांपेक्षा जास्त कर्ज (Loan) मिळते. या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

लोक उद्योजक बनण्याची इच्छा पूर्ण करु शकतात

या योजनेद्वारे कर्ज घेऊन लोक उद्योजक बनण्याची इच्छा पूर्ण करु शकतात. याद्वारे छोटे व्यावसायिक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकतात. यासोबतच लोक कर्जाच्या रकमेतून त्यांचा व्यवसाय (Business) वाढवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT