PM Kisan FPO Yojana: PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, खात्यात येणार एवढे लाख रुपये; असा करा अर्ज

PM Kisan FPO Yojana: मोदी सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan FPO Yojana: मोदी सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरु आहेत.

या क्रमाने शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपये दिले जात आहेत. सरकारच्या या योजनेचा ऑनलाईन लाभ तुम्ही कसा घेऊ शकता.

11 शेतकऱ्यांची एकत्रित संघटना स्थापन करण्याची तरतूद

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (Farmers) 15 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. यामध्ये देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना जोडून संस्था किंवा कंपनी स्थापन करण्याची तरतूद आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे. या योजनेंतर्गत फॉर्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला 15 लाख रुपये दिले जातील.

PM Narendra Modi
PM Kisan Scheme: करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 6000 ऐवजी खात्यात येणार 12000 रुपये!

अर्ज कसा करायचा

सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

होम पेजवर दिलेल्या FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

येथे 'Registration' पर्यायावर क्लिक करा, आता नोंदणी फॉर्म उघडेल.

आता फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.

पासबुक स्कॅन करा आणि अपलोड करा किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी पुरावा.

आता सबमिट पर्यायावर क्लिक करा.

याप्रमाणे लॉग इन करा

लॉग इन करण्यासाठी, प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

होम पेजवर दिलेल्या FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा आणि लॉगिन फॉर्म तुमच्या समोर उघडेल.

त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका, त्याद्वारे लॉग इन करा.

PM Narendra Modi
PM Kisan Scheme: पीएम किसानचा 14 वा हप्ता पुढच्या महिन्यात येणार, तारीख जाहीर; पीएम मोदी...!

सरकारचे ध्येय

1. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी 2023-24 पर्यंत 10,000 FPO ची निर्मिती.

2. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि योग्य मोबदला मिळण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.

3. नवीन FPO ला 5 वर्षांपर्यंत सरकारकडून (Government) हात धरुन आणि समर्थन प्रदान करणे.

4. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी-उद्योजक कौशल्ये विकसित करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com