Money Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF Scheme च्या नियमांमध्ये सरकारने केला मोठा बदल! तुम्ही कधीही पैसे...

Central Government Scheme: सरकारी योजनांबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध घोषणा केल्या जातात. आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

PPF Scheme Latest Update: जर तुम्हीही PPF योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकारी योजनांबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध घोषणा केल्या जातात. आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

दरम्यान, आजच्या काळात पीपीएफ हा गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानला जातो. यामध्ये तुम्हाला भरघोस व्याजासह चांगला परतावा मिळतो, पण आता तुम्हाला तुमच्या पीपीएफ खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढायचे असतील तर जाणून घ्या नियमांमध्ये काय बदल झाले आहेत-

चक्रवाढ व्याजाचा लाभ घ्या

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये तुम्हाला कंपाउंडिंगच्या आधारे 7.1 टक्के परतावा मिळतो. असे अनेक वेळा घडते की, तुम्ही पैसे गुंतवता, परंतु हे पैसे आपत्कालीन परिस्थितीत काढावे लागतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी खात्यातून पैसे कसे काढू शकता का नाही ते सांगणार आहोत.

मॅच्युरिटीपूर्वी मी खात्यातून पैसे काढू शकतो का?

त्याचबरोबर, जर तुम्ही वेळेपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला पैसे काढण्याचे कारण विचारले जाते. विशेष म्हणजे, तुम्हाला पूर्ण रक्कम दिली जात नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे देखील स्वतःचे नियम आहेत, त्याच्या नियमांनुसार, तुम्ही 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकता आणि 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते बंद देखील करु शकता.

जर तुम्हाला 6 वर्षापूर्वी काही पैसे काढायचे असतील, तर तुमच्याकडे काढण्याचे वैध कारण असले पाहिजे, तरच तुम्ही तुमचे पैसे काढू शकता.

मी पैसे कधी काढू शकतो?

पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे वैध कारण असणे आवश्यक आहे. जसे की तुम्हाला कोणत्याही आजारावर उपचार करायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उपचारासाठी पैसे काढू शकता. याशिवाय, तुम्ही मुलांचे शिक्षण आणि मुलांच्या लग्नासाठीही (Marriage) पैसे काढू शकता.

PPF काढण्याचे नियम

1. पीपीएफमध्ये पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

2. त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म सी डाउनलोड करावा लागेल.

3. फॉर्म भरल्यानंतर तो बँकेत जमा करा.

4. आणि तुमचे PPF खाते बँकेला दाखवा.

5. यानंतर बँक तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम देईल.

500 रुपयांपासून सुरुवात करु शकता

या योजनेत एक व्यक्ती 500 रुपयांपासून सुरुवात करु शकते. त्याचवेळी, आर्थिक वर्षात तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक (Investments) करु शकता. इतकंच नाही तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधाही मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT