Budget Expectation: PPF खातेदारांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्री करणार 'ही' मोठी घोषणा!

Budget 2023: 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Dainik Gomantak
Published on
Updated on

Budget 2023 Expectation: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी जवळपास एक महिना बाकी आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. मात्र त्याआधी अर्थमंत्र्यांना विविध क्षेत्रांच्या वतीने त्यांच्या मागण्यांची माहिती दिली जात आहे. यासोबतच केंद्रीय अर्थमंत्र्यांना आगामी अर्थसंकल्पात दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पात शेतकरी (Farmer) आणि नोकरदार दोघांनाही दिलासा देण्याचा सरकार विचार करत असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. केंद्रीय अर्थसंकल्पात कलम 80C अंतर्गत बचतीची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरुन 2.5 लाख रुपये करणे अपेक्षित आहे. ICAI कडून प्री-बजेट मेमोरँडम 2023 मध्ये, सामान्य माणसाला अधिक बचत करण्यास सांगितले आहे.

Nirmala Sitharaman
BUDGET 2023: स्वप्नातील घर होणार साकार, अर्थमंत्री 'या' दिवशी करणार मोठी घोषणा?

80C अंतर्गत सवलत मिळावी

80C अंतर्गत सवलत मिळावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत. ICAI ने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणुकीची (Investment) मर्यादा वाढवण्याची मागणीही केली आहे. सध्या ही मर्यादा दीड लाख असून ती वाढवून तीन लाख करण्याची मागणी केली जात आहे. PPF मर्यादा वाढवण्याच्या मागणीमागे आयसीएआयचा युक्तिवाद असा आहे की, हा व्यावसायिकांसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.

Nirmala Sitharaman
PM Kisan Yojana Budget 2023: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसान योजनेची वाढणार रक्कम!

तसेच, नोकरदारांचा पीएफ जमा झाल्यामुळे त्याअंतर्गत गुंतवणुकीला फारसा वाव नाही. अशा स्थितीत त्याच्याकडे कर बचतीचे मर्यादित पर्याय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची मर्यादा वाढवण्याची मागणी होत आहे. याशिवाय, ICAI ने वित्त मंत्रालयाला 80DDB अंतर्गत खर्चाची मर्यादा वाढवण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com