Post Office Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: पोस्टाने आणली तुमच्या फायद्याची स्कीम, जाणून घ्या

Narendra Modi investment In NSC: तुम्हालाही छोटी गुंतवणूक करुन नफा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिस हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

दैनिक गोमन्तक

Narendra Modi investment In NSC: तुम्हालाही छोटी गुंतवणूक करुन नफा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिस हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पंतप्रधानही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाइफ इन्शुरन्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, जून 2020 मध्ये त्यांनी NSC मध्ये 8 लाख 43 हजार 124 रुपये गुंतवले आहेत. तर जीवन विम्यासाठी त्यांनी 1 लाख 50 हजार 957 रुपये प्रीमियम जमा केला होता. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

जर तुम्हाला शून्य जोखमीवर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करु शकता. जर तुम्हाला सुरक्षित आणि सरकारी योजनेत गुंतवणूक (Investment) करायची असेल तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करु शकता. ही सुरक्षित गुंतवणूक आहे. त्याचबरोबर ती पोस्टाच्या छोट्या बचत योजनेचा भाग आहे. पंतप्रधान स्वतः त्यात गुंतवणूक करतात.

गुंतवणूक कशी करावी?

या पोस्टाच्या योजनेवर सध्या 6.8% व्याजदर आहे. तुम्ही या योजनेत किमान रु 1,000 गुंतवू शकता आणि 100 च्या पटीत पैसे गुंतवू शकता. मात्र, यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

सिंगल टाइप- या प्रकारात तुम्ही स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करु शकता.

ज्वाइंट ए टाइप- या प्रकारचे प्रमाणपत्र कोणतेही दोन लोक एकत्र घेऊ शकतात, म्हणजेच दोन लोक एकत्र गुंतवणूक करु शकतात.

ज्वाइंट बी टाइप- यामध्ये दोन लोक गुंतवणूक करतात, परंतु मॅच्युरिटीवर पैसे फक्त एकाच गुंतवणूकदाराला दिले जातात.

तुम्ही किती गुंतवणूक करु शकता?

या पोस्ट ऑफिस योजनेवर सध्या 6.8% व्याजदर आहे. तुम्ही या योजनेत किमान रु 1,000 गुंतवू शकता आणि 100 च्या पटीत पैसे गुंतवू शकता. मात्र, यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

आयकर सवलत

जर तुम्ही NSC मध्ये देखील गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करुन कर सूट देखील मिळेल. करपात्र उत्पन्नाच्या बाबतीत, एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT