Post office Scheme: पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणूक, बँकेपेक्षा अधिक मिळेल फायदा

Post Office Scheme: तुम्हालाही सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Post Office Scheme
Post Office SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

Post office Scheme: तुम्हालाही सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Post Office Fixed Deposit) करुन तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. यामध्ये तुम्हाला नफ्यासह सरकारी हमी मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला व्याजाची सुविधा (Post Office FD Interest Rate 2021) तिमाही आधारावर मिळते.

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी मिळवणे सोपे

पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) एफडी मिळवणे खूप सोपे आहे. इंडिया पोस्टने आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची सर्व माहिती दिली आहे. या माहितीनुसार, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या 1,2, 3, 5 वर्षांसाठी एफडी (FD) मिळवू शकता. या योजनेत कोणते फायदे उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया...

Post Office Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्याचसाठी, मिळवा 16 लाख रुपये

1. भारत सरकार तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्यासाठी हमी देते.

2. यामध्ये गुंतवणूकदारांचे (Investors) पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

3. यामध्ये एफडी ऑफलाइन (रोख, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग / मोबाईल बँकिंग) द्वारे करता येते.

4. यामध्ये तुम्ही 1 पेक्षा जास्त FD करु शकता.

5. याशिवाय FD खाते संयुक्त असू शकते.

6. यामध्ये 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट केल्याने तुम्हाला आयटीआर दाखल करताना कर सूट मिळेल.

7. एखाद्या पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये एफडी सहजपणे ट्रान्सफर करु शकतो.

Post Office Scheme
Post Office Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना; मिळेल 7.6% पर्यंत परतावा

अशी FD उघडा

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी मिळवण्यासाठी तुम्ही चेक किंवा रोख रक्कम देऊन खाते उघडू शकता. यामध्ये, किमान 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. त्याचबरोबर जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

Post Office Scheme
Post Office Scheme: तुमचे पैसे होतील दुप्पट , फक्त करावी लागेल अशी गुंतवणूक

FD वर भरपूर व्याज मिळवा

या अंतर्गत 7 दिवस ते एक वर्षाच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळते. हाच व्याजदर 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर देखील उपलब्ध आहे. त्याच वेळी, 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.50 टक्के दराने व्याज देखील उपलब्ध आहे. 3 वर्षांच्या एका दिवसापासून 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.70 टक्के व्याज मिळते. म्हणजेच, इथे तुम्हाला FD वर चांगला नफा मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com