Post Office Scheme 
अर्थविश्व

Post Office Scheme: लखपती बनायचंय? पोस्टाच्या 'या' योजनेत आजच करा गुंतवणूक; 5 वर्षांत मिळतो तगडा रिटर्न्स

National Savings Certificate: पोस्ट ऑफिसची 'नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट' (NSC) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते.

Manish Jadhav

Post Office Scheme: जर तुम्हाला कोणताही धोका न पत्करता आपले पैसे गुंतवून चांगली कमाई करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची 'नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट' (NSC) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. ही सरकारची हमी असलेली योजना असून, ती 5 वर्षांत परिपक्व (Mature) होते.

निवृत्तीसाठी जमा केलेले पैसे, जमीन विक्रीतून मिळालेले पैसे किंवा इतर कोणतीही मोठी एकरकमी रक्कम असल्यास, तुम्ही ती एनएससीमध्ये (NSC) गुंतवून चांगले व्याज (Interest) मिळवू शकता. यात परतावा निश्चित असतो आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. तुम्ही फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊन केवायसी (KYC) आणि आवश्यक कागदपत्रे जमा करुन खाते उघडू शकता.

एनएससीमध्ये कोण गुंतवणूक करु शकतो?

दरम्यान, या योजनेत कोणताही व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. तुम्ही एकट्याने खाते उघडू शकता किंवा जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती (Adults) मिळून संयुक्त खाते (Joint Account) देखील उघडू शकता. 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुले स्वतःचे खाते उघडू शकतात. जर मूल लहान असेल किंवा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल, तर त्याचे पालक त्याच्या नावाने खाते उघडू शकतात. तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी (Nominee) म्हणून नियुक्त करु शकता. या योजनेत तुम्ही पाहिजे तितकी खाती उघडू शकता.

  • किमान गुंतवणूक: फक्त 1,000 रुपये.

  • जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा: कोणतीही मर्यादा नाही, तुम्ही पाहिजे तेवढे पैसे गुंतवू शकता.

या योजनेतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात केलेली गुंतवणूक (Investment) इनकम टॅक्स ॲक्टच्या कलम 80सी (Income Tax Act, Section 80C) अंतर्गत कर सवलतीच्या (Tax Exemption) कक्षेत येते. तुम्ही एका वर्षात दीड लाख रुपयांपर्यंत (₹1.5 Lakhs) करमुक्त गुंतवणूक करु शकता.

किती मिळेल परतावा?

सध्या या योजनेवर वार्षिक 7.7% व्याज (7.7% Annual Interest) मिळते, जे चक्रवाढ पद्धतीने (Compounding) वाढत राहते. व्याजाची रक्कम 5 वर्षे पूर्ण झाल्यावरच मिळते. पहिले 4 वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जाते, ज्यावर कर सवलत मिळते, परंतु पाचव्या वर्षाचे व्याज करपात्र (Taxable) असते.

गरज पडल्यास कर्ज देखील घेऊ शकता

जर तुम्हाला कधी पैशांची गरज भासल्यास, तुम्ही तुमचे एनएससी बॉन्ड बँक (Bank) किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये (NBFC) गहाण ठेवून कर्ज (Loan) घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमची बचत (Savings) तोडावी लागणार नाही आणि पैशांची व्यवस्थाही होईल. तथापि, गुंतवणूकदाराचा मृत्यू किंवा न्यायालयाच्या आदेशासारख्या काही विशिष्ट परिस्थिती वगळता, खाते 5 वर्षांपूर्वी बंद केले जाऊ शकत नाही.

पती-पत्नी दोघांसाठीही फायदेशीर

जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील, तर संयुक्त खाते उघडून त्यांना जास्त फायदा मिळू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दोघे मिळून 9 लाख रुपये गुंतवत असाल, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला सुमारे 13,04,130 रुपये मिळतील. यामध्ये 4,04,130 रुपये व्याजाच्या स्वरुपात असतील. एकंदरीत, ही योजना अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना कमी जोखीम घेऊन सरकारची हमी असलेला सुरक्षित परतावा हवा आहे. पोस्ट ऑफिसची एनएससी केवळ पैसे वाढवत नाहीतर कर वाचवण्यातही मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT