Manish Jadhav
'थंबे-थंबे तळे साचे' मराठीतील ही म्हण तुम्हाला माहिती असेलच. पोस्टाच्या बचत योजना याच म्हणीप्रमाणे आहेत.
आज (3 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पोस्टाच्या अशा 4 योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मजबूत परतावा देतात.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे. ज्यामध्ये SCSS वर 8.2 टक्के व्याज आहे.
पोस्ट ऑफिसमधील सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी वयाच्या 18 ते 21 वर्षांपर्यंत आहे. यामध्ये SSY वर 8.2 टक्के व्याज आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत NSC वर 7.7 टक्के व्याज मिळते.
किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसने सुरु केलेली कमी जोखमीचा बचत पर्याय आहे. KVP वर 7.5 टक्के व्याज मिळते.