Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office: पोस्टाची ही योजना बनवणार लखपती! 50 रुपये जमा करुन मिळवा 35 लाख

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

दैनिक गोमन्तक

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. वास्तविक, कोणत्याही गुंतवणुकीशी संबंधित जोखीम घटक असतो. अशा परिस्थितीत, अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला शून्य जोखमीसह चांगला परतावा मिळेल. तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला नफाही मिळेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय आहे.

35 लाखांचा बंपर परतावा!

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टर कमी असतो. त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. आम्‍ही तुम्‍हाला अशा एका गुंतवणूकीचा (Investment) पर्याय सांगत आहोत, ज्यात जोखीम खूपच नगण्य आहे. दुसरीकडे, परतावाही चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' हा असा एक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.

गुंतवणुकीचे नियम जाणून घ्या

  • 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक (Citizens) या योजनेत गुंतवणूक करु शकतो.

  • या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

  • या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.

  • प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची सूट मिळते.

  • या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.

  • ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ते सरेंडरही करु शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

किती फायदा होईल?

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT