Post Office: पोस्टाच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

Post Office News: तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Post Office
Post OfficeDainik Gomantak

Post Office News: तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसने एक मोठा नियम बदलला आहे. आता पोस्ट ऑफिसने पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. पोस्ट ऑफिसच्या नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहेत. पोस्ट ऑफिसने ही माहिती दिली आहे.

ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

पोस्ट ऑफिसने (Post Office) दिलेल्या माहितीनुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) वरुन व्यवहार शुल्क बदलले आहे. एका अधिसूचनेनुसार, हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. नवीन नियमानुसार, जे IPPB चे ग्राहक (Customer) नाहीत त्यांना 1 पेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. यामध्ये आधारद्वारे पैसे काढणे, जमा करणे किंवा मिनी स्टेटमेंट तयार करणे देखील समाविष्ट आहे.

Post Office
Post Office Saving Scheme: दररोज फक्त 95 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 14 लाख

पोस्ट ऑफिस माहिती

पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एका महिन्यात मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये + GST ​​शुल्क भरावे लागेल. इतकेच नाही तर मिनी स्टेटमेंटसाठी प्रति व्यवहार 5 रुपये द्यावे लागतील. पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Post Office
Post Office Scheme: आता कार-बंगला घेण्यासाठी सज्ज व्हा, ही योजना देतेय बंपर परतावा!

NPCI काय म्हणते ते जाणून घ्या

NPCI च्या मते, आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक्स वापरुन फायदे मिळवण्यासाठी AePS वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित आहे. AePS एखाद्या व्यक्तीच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक/आयरिस माहितीवर कार्य करते, अशा प्रकारे फसवणुकीचे धोके दूर करते. त्याचबरोबर, AePS ग्राहकांना अधिक सुरक्षा प्रदान करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com