Government Scheme, SSY, Sukanya Samriddhi Yojana information in Marathi Dainik Gomantak
अर्थविश्व

'या' सरकारी योजनेचा लाभ घेवून करा मुलींचे भविष्य सुरक्षित

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना देखील समाविष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस या सरकारी योजनेचा वापर करून करू शकता. या योजनांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला आर्थिक फयदा मिळेल. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसेही (Money) पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) तसे होत नाही . याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रक्कम भरून गुंतवणूक करता येते . पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा (SSY) देखील समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. (Sukanya Samriddhi Yojana information in Marathi)

* व्याज दर

पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर देत आहे. या लहान बचत योजनेत, व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते आणि वार्षिक आधारावर चक्रवाढ केली जाते.

* गुंतवणूक रक्कम

या लहान सरकारी बचत योजनेत, एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवावे लागतात. यानंतर, 50 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. एका महिन्यात किंवा वर्षात ठेवींच्या रकमेवर मर्यादा नाहीत.

* खाते कोण उघडू शकते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक पालक 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत भारतात (India) मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेमध्ये (Bank) उघडता येते. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. जुळी मुले असल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात.

* मॅच्योरिटी

या सरकारी योजनेत खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनंतर बंद करता येते. याशिवाय मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्नाच्या वेळीही खाते बंद करता येते. असे लग्नाच्या तारखेच्या तीन महिन्यांनंतर किंवा एक महिना आधी केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT