Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office ने पैसे काढण्याबाबतचे बदलले नियम, हे जाणून घ्या

गेल्या काही वर्षांत इंडिया पोस्टने आपल्या सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

पोस्ट ऑफिसचे (Post Office) जाळे देशभरात वेगाने पसरत आहे. बँकेसारख्याच सुविधा आता पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध होत आहेत. गेल्या काही वर्षांत इंडिया पोस्टने आपल्या सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. इंडिया पोस्टला बऱ्याच दिवसांपासून तक्रारी येत होत्या की, ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी व्याधीग्रस्त असलेले लोक पोस्ट ऑफिस केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा योग्य लाभ घेऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसने आता आपले नियम बदलले आहेत.

पोस्ट ऑफिसला तक्रारी येत होत्या की, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांना बऱ्याचदा विड्रॉल करताना अडचण येत होत्या. त्याचबरोबर त्यांना पोस्ट ऑफिस सेंटरपर्यंत पोहोचणेही अवघड होते. खातेधारकाला कर्जाची सुविधा, प्रीमैच्योर क्लोजर, खाते बंद करणे यासारख्या गोष्टी करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाणे आवश्यक असते. आता इंडिया पोस्टने यासाठीचे नियम सोपे केले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसह आजारी लोकांना केंद्राला भेट देण्यापासून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता उत्तराधिकारी देखील खातेधारकाच्या वतीने असे काम करु शकतो.

खातेदाराला यासाठी फॉर्म -12 भरावा लागेल आणि पोस्टमास्तरला पत्र लिहावे लागेल. या पत्रात, खातेदाराला हे सांगावे लागेल की, तो अशा व्यक्तीला पैसे काढणे, प्री-क्लोजर, ठेव, कर्ज इत्यादीसाठी परवानगी देण्यात यावी.

यासाठी खातेदाराच्या वतीने अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी प्रमाणित करणे आवश्यक आहे. जर ते संयुक्त खाते असेल तर दोघांपैकी कोणीही अधिकृत व्यक्तीच्या स्वाक्षरीची साक्ष देऊ शकते. लक्षात ठेवण्याची एक विशेष गोष्ट म्हणजे अधिकृत व्यक्तीने पोस्ट ऑफिसमध्ये काम करु नये.

पैसे काढण्यासाठी, खातेदाराला पैसे काढण्याचा फॉर्म एसबी -7 (Form SB-7) भरावा लागेल, क्लोजर फॉर्म एसबी -7 ए साठी, प्री-मॅच्युअर क्लोजरसाठी, फॉर्म एसबी -7 बी आणि कर्जासाठी, फॉर्म एसबी -7 सी भरावा लागेल. या फॉर्मवर खातेदाराची स्वाक्षरी आवश्यक आहे. यासह, खातेदार आणि अधिकृत व्यक्तीचा आयडी आणि पत्त्याच्या पुराव्याची स्व-साक्षांकित प्रतही जोडावी लागेल. नंतर पुढील प्रक्रिया केली जाईल आणि बाहेर काढण्यासह इतर कामे केली जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT