AIR India कंपनीचा लिलाव होणारच: ज्योतिरादित्य सिंधिया

एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंतवणुकीसंदर्भात (Privatization), केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
AIR India to be auctioned: Jyotiraditya Scindia
AIR India to be auctioned: Jyotiraditya ScindiaDainik Gomantak

एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंतवणुकीसंदर्भात (Privatization), केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रचंड कर्जात बुडलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया ट्रॅकवर आहे आणि त्यासाठी आर्थिक बोली लागल्यास पुढील पाऊल उचलले जाईल असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच 15 सप्टेंबर पर्यंत या प्रक्रियेचे पुढचे पाऊल उचलले जाईल असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे. (AIR India to be auctioned: Jyotiraditya Scindia)

इंदूरमध्ये सिंधिया म्हणाले की, एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आमची प्रक्रिया ट्रॅकवर आहे. यासाठी आर्थिक निविदा 15 सप्टेंबरपर्यंत आल्या पाहिजेत. या निविदा मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलले जाईल.

देशात ड्रोन उडवण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने सरकार वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती देसखील नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली आहे. "आम्ही संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून ड्रोन ऑपरेशनसाठी नियम बनवले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, आम्ही ड्रोन ऑपरेशनसाठी देशाला लाल, हिरव्या आणि पिवळ्या झोनमध्ये विभागू."असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

AIR India to be auctioned: Jyotiraditya Scindia
जर तुम्ही फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर आधी 'ही' बातमी वाचा

सिंधिया म्हणाले की, विमानांप्रमाणेच, ड्रोनचा उड्डाण मार्ग देशभरात निश्चित केला जाईल आणि एका सॉफ्टवेअरच्या आधारे लोकांना निर्दिष्ट क्षेत्रात ड्रोन उडवण्याची परवानगी दिली जाईल. ते म्हणाले, "वाहनांप्रमाणे ड्रोनचीही नोंदणी केली जाईल आणि ड्रोन उडवणाऱ्या लोकांना परवाने दिले जातील."

नागरी उड्डयन मंत्री म्हणाले की "उडान" योजनेअंतर्गत देशात हवाई सेवांचे "लोकशाहीकरण" केले जात आहे आणि 2025 पर्यंत 1,000 नवीन विमान मार्ग आणि 100 नवीन विमानतळ उभारण्याचे लक्ष्य साध्य करण्याचे काम सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com