Post Office Scheme  Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme : 35 लाखांच्या नफ्यासाठी गुंतवा फक्त 50 रुपये !

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'ग्राम सुरक्षा योजना' मध्ये कमी गुंतवणूक करून अधिक परतावा मिळतो.

दैनिक गोमन्तक

आजच्या महामारीच्या काळात गुंतवणूक करणे गराजेचे आहे. कारण तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला अडीअडचणीला उपयोगी पडू शकते.पण जेव्हा गुंतवणूक (Investment) करण्याचा आपण विचार करतो तेव्हा कुठे गुंतवणूक करावी या प्रश्नाने गोंधळून जातो. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा एकउत्तम पर्याय आहे. पोट ऑफिसमध्ये गुणतवणूक करणे म्हणजे कमी गुंतवणूकीमध्ये अधिक फायदा मिळतो. (Post Office Gram Suraksha Scheme News)

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) अशा अनेक लहान बचत योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने फसवणूक होण्याचा धोका कमी असतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या 'ग्राम सुरक्षा योजना' योजनेबद्दल सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या 'ग्राम सुरक्षा योजने'मध्ये अधिक परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्यात 1500 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही या योजनेत नियमितपणे पैसे जमा करत असाल तर तुम्हाला 31 ते 35 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

* या योजनेत गुंतवणुक करण्याचे नियम

* कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

* गुंतवणुकीसाठी तुमचे वय 19 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे.

* या योजनेत किमान विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते.

* या योजनेतील प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरले जाऊ शकतात.

* यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.

* या योजनेद्वारे तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.

* तुम्ही ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी बंद करू शकता. परंतु असे केल्याने तुम्हाला फारसा फायदा होणार नाही.

* या योजनेचा किती फायदा होईल मिळेल

उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी काढली असेल तर त्याचा 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम . 1515, 58 रुपये वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411रुपये होईल. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT