McDonald'sनंतर आता स्टारबक्सनेही केले रशियातील व्यवसाय बंद, अनेकांचा रोजगार जाणार

रशियातील स्टारबक्स स्टोअर्स मार्चपासून बंद आहेत. कंपनीने रशियामधील सर्व व्यावसायिक आता थांबवले आहेत.
Starbucks Russia
Starbucks RussiaTwitter

रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम व्यवसाय क्षेत्रावर होत आहे. त्याचा केवळ भौगोलिक-राजकीयच प्रभाव पडला नाही, तर व्यापार जगतावरही या लढ्याचा मोठा परिणाम झाला आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियातील अनेक कंपन्यांनी आपले व्यवसाय (Business) बंद केले आहेत. आता या यादीत कॉफी (coffee) चेन चालवणाऱ्या स्टारबक्सचेही नाव समाविष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. (Starbucks Russia)

स्टारबक्स (Starbucks) कॉर्पने सोमवारी सांगितले की सुमारे 15 वर्षांच्या उपस्थितीनंतर रशियन बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या काही दिवसांपूर्वी रेस्टॉरंट चेन कंपनी मॅकडोनाल्डनेही रशिया सोबतचा व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती. आता स्टारबक्स या चेनमध्ये सामील झाल्यामुळे, बहुतेक मोठ्या पाश्चात्य कंपन्यांनी रशियामधील त्यांची उपस्थिती गमावली आहे. रशियामध्ये स्टारबक्सची 130 स्टोअर्स होती, ज्यांना अल्शाया ग्रुपने चालवण्याचा परवाना दिला होता. स्टारबक्सचे रशियामध्ये सुमारे 2000 कर्मचारी होते.

Starbucks Russia
आदानी ग्रुपच्या शेअर्सची गगनभरारी, गुंतवणूकदार बनले मालामाल

मॅकडोनाल्डची दुकानेही बंद होत आहेत

दरम्यान, स्टारबक्सचा निर्णय काही प्रकारे McD सारख्या कंपन्यांपेक्षा वेगळा आहे. मॅकडोनाल्ड्सने गेल्या आठवड्यात सांगितले की ते स्थानिक परवानाधारक अलेक्झांडर गोव्हर यांना त्यांचे सर्व रेस्टॉरंट विकत आहेत, जे सर्व स्टोअर्स नवीन नावाने पुनर्ब्रँड करतील. त्याचप्रमाणे फ्रेंच ऑटो कंपनी रेनॉल्टने रशियातील सर्वात मोठ्या कार कंपनीतील आपला भागभांडवल विकण्याची घोषणा केली, परंतु त्यांनी ही हिस्सेदारी खरेदी करण्याचा पर्याय खुला ठेवला.

Starbucks Russia
दिल्ली पोलिस खात्यामध्ये भरती प्रक्रिया होणार सुरू, जाणून घ्या प्रक्रिया

रशियातील स्टारबक्स स्टोअर्स मार्चपासून बंद आहेत. कंपनीने रशियामधील सर्व व्यावसायिक क्रियाकलाप आधीच थांबवले आहेत. मार्चपासून कंपनी रशियाला आपली उत्पादनेही पाठवत नाही. स्टारबक्सने 2007 मध्ये रशियामध्ये पहिले स्टोअर उघडले होते. कंपनीने सांगितले की ते रशियामधील आपल्या कर्मचार्‍यांचे समर्थन करत राहील. यामुळे कंपनी रशियातील आपल्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांचा पगार देत आहे. मात्र, स्टारबक्सने रशियामधील व्यवसाय बंद केल्याने आर्थिक परिणाम काय होईल हे सांगितले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com