Post Office Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Yojana: पोस्टाची धमाकेदार योजना! दररोज 50 रुपये गुंतवून बना 'लखपती'; 'या' योजनेतून मिळतो तगडा रिटर्न

Post Office Gram Suraksha Yojana: भारतीय पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. ही योजना खास करुन अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Post Office Gram Suraksha Yojana: कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. ही योजना खास करुन तुमच्यासाठीच तयार करण्यात आली आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यात दररोज 50 रुपये म्हणजेच महिन्याला 1,500 रुपयांची गुंतवणूक करुन तुम्ही मॅच्युरिटीवर तब्बल 35 लाखांपर्यंतची मोठी रक्कम मिळवू शकता.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

‘ग्राम सुरक्षा योजना’ ही पोस्टाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) अंतर्गत चालवली जाते, जी ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 10 लाख पर्यंतचा विमा घेऊ शकता. वय आणि पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, 19 ते 55 वर्षांपर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. गुंतवणुकीचा (Investment) कोणताही धोका नसल्यामुळे ही योजना कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.

गुंतवणुकीचे पर्याय आणि इतर फायदे

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूकदारांना (Investors) प्रीमियम भरण्यासाठी अनेक सोयीस्कर पर्याय मिळतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रीमियमचा भरणा मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर करु शकता. ज्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण येत नाही.

याव्यतिरिक्त, या पॉलिसीचे आणखी काही मोठे फायदे आहेत.

  • कर्जाची सुविधा: पॉलिसी सुरु झाल्याच्या चार वर्षांनंतर तुम्ही या योजनेवर कर्ज (loan) देखील घेऊ शकता.

  • पॉलिसी सरेंडर: जर तुम्हाला काही कारणास्तव ही पॉलिसी बंद करायची असेल, तर तीन वर्षांनंतर ती सरेंडर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, जर पॉलिसी पाच वर्षांच्या आत सरेंडर केली, तर तुम्हाला बोनसचा लाभ मिळणार नाही.

मृत्यू लाभ (Death Benefit)

जर पॉलिसीधारकाचा मृत्यू योजनेची मुदत पूर्ण होण्यापूर्वी झाला, तर त्याच्या नॉमिनीला (nominee) मृत्यू लाभ (Death Benefit) म्हणून विम्याची रक्कम आणि जमा झालेला बोनस अशी संपूर्ण रक्कम दिली जाते. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहते. या योजनेची मॅच्युरिटी कमाल 80 वर्षांच्या वयापर्यंत केली जाऊ शकते. यामुळे गुंतवणूकदार जितक्या कमी वयात यात सामील होईल, तितके जास्त परतावा (Return) मिळण्याची शक्यता असते.

35 लाख कसे मिळतात?

जर एखादी व्यक्ती 19 वर्षांच्या वयात या योजनेत सामील झाली आणि ती दर महिन्याला 1,500 (म्हणजेच दररोज 50) प्रीमियम भरत राहिली, तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तिला सुमारे 31 ते 35 लाखापर्यंतची मोठी रक्कम मिळू शकते. ही रक्कम पॉलिसीची मुदत विम्याची रक्कम आणि बोनस दर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. ही योजना कमीत कमी गुंतवणूक करुन तगडा रिटर्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer: राजकारण जिंकलं, श्रेयस अय्यर हरला... टीम इंडियावर गंभीर आरोप

Viral Video: नदीतून बाहेर येताच पोरीनं घातली लाथ, अतरंगी रीलचा सोशल मीडियावर धूमाकूळ; नेटकरी हैराण

Konkan Tourism in Monsoon: हिरवाई, धबधबे आणि समुद्रकिनारे... पावसात खुललेलं 'कोकण', निसर्गाच्या कुशीतली 10 अप्रतिम स्थळं, नक्की भेट द्या

SA vs AUS: कांगांरुंची दैना उडवत दक्षिण आफ्रिकेनं मोडला 31 वर्ष जुना रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, केशव महाराज ठरला विजयाचा 'हिरो'

Goa Police Attack: रस्त्यात अडवून पोलिसांना मारहाण, बेतूल घटनेनंतर वास्कोत 'गुंडाराज'; गोव्यात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका?

SCROLL FOR NEXT