PM Narendra Modi's 'Economic Vision' on Independence Day Dainik Gomantak
अर्थविश्व

स्वातंत्रदिनाला PM मोदींचे 'इकॉनॉमिक व्हिजन', पाहा काय म्हणाले

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 75 व्या स्वातंत्रदिनाच्या (75thIndependenceDay) निम्मिताने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) यशाचा उल्लेख केला करत समाधान व्यक्त केले आहे. यासोबतच देशाच्या प्रगतीच्या मार्गासंदर्भात सरकारची दृष्टीही त्यांनी यावेळी मांडली . ते म्हणाले की कोविड (COVID-19) काळात देशात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक (Foreign Investments) आली आहे.दुसरीकडे, परकीय चलन (Foreign currency) साठा देखील आतापर्यंतच्या उच्चांकापर्यंत पोहोचला असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले आहे . यावेळी देशाच्या आर्थिक प्रगतीची (Economic Development) ब्लू प्रिंट सादर करताना ते म्हणाले, "आम्हाला पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांसाठी एकत्र काम करावे लागेल. जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल. कटिंग एज इनोव्हेशनसाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल. नवीन युग तंत्रज्ञानासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल."(PM Narendra Modi's 'Economic Vision' on Independence Day)

त्याचबरोबर देशातील व्यवसायाच्या वातावरणाबद्दल पीएम मोदी म्हणाले, "आपण पाहिले की , कोरोना युगात हजारो नवीन स्टार्ट-अप्स तयार झाले आहेत, आणि ते यशस्वीरित्या काम करत आहेत. आजचे स्टार्ट-अप्स हे उद्याचे युनिकॉर्न बनत आहेत. त्यांचे मार्केट मूल्य हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. "

तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व उत्पादकांना आवाहन केले की, "तुम्ही पाठवलेले उत्पादन हे फक्त तुमच्या कंपनीत तयार केलेले उत्पादन नाही.तर भारताची ओळख त्याच्याशी निगडित आहे,देशाची प्रतिष्ठा जोडलेली आहे, भारताच्या लोकांचा विश्वास जोडलेला आहे. तुमचे प्रत्येक उत्पादन भारताचे ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जोपर्यंत ते उत्पादन वापरात आहे, तोपर्यंत खरेदीदार म्हणेल - होय ते भारतातच बनले आहे."

पंतप्रधान म्हणाले की विकासाच्या मार्गावर पुढे जाताना भारताला आपले उत्पादन आणि निर्यात दोन्ही वाढवावे लागेल. ते म्हणाले, "आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधनित भारताने एक समग्र दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. येत्या काळात भारत पंतप्रधान गतिशक्ती - राष्ट्रीय मास्टर प्लॅन लाँच करणार असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगतले आहे.

ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या प्रगतीसाठी, भारताने आत्मनिर्भर भारत करण्यासाठी ऊर्जा स्वतंत्र असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज भारताला एक संकल्प घ्यावा लागेल की आपण भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या 100 वर्षांपूर्वी भारत वीजउत्पादनातही स्वतंत्र होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT