"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास": मोदींचा नवीन नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अगोदर लाल लाल किल्ल्यावर ध्वजरोहण संपन्न झाले आणि त्यांनंतर त्यांनी देशाला संबोधित केले. ( Independence Day )
PM Narendra Modi addresses Nations on  Independence Day
PM Narendra Modi addresses Nations on Independence Day Twitter @ ANI
Published on
Updated on

संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे (75thIndependenceDay). या वर्षी स्वातंत्र्य दिन 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण देश देशभक्तीने परिपूर्ण असा सज्ज झाला आहे. देशभरातील विविध ठिकाणी मंत्रालये, राज्य सरकारे, लष्करी दले आणि सामान्य जनतेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(PM Narendra Modi addresses Nations on Independence Day)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) वर्धापन दिन सोहळ्याचे नेतृत्व करतील. आज सकाळी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवत राष्ट्राला संबोधितकेले . भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मार्च 2021 मध्ये अहमदाबाद, गुजरातमधील साबरमती आश्रमातून 'आजादी का अमृत महोत्सव' सुरू केला होता. हा सण 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे.

आज लाल किल्ल्यावरच्या (Red Fort) सोहळ्यासाठी ओलीम्पिकचे (Tokyo Olympics) सर्व खेळाडू देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अगोदर लाल लाल किल्ल्यावर ध्वजरोहण संपन्न झाले आणि त्यांनंतर त्यांनी देशाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश आज महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राणी लक्ष्मीबाई, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्वांना आठवत आहे. पीएम मोदी म्हणाले की विजय आणि पराजय येतच राहतात, पण त्यांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा कधीच संपली नाही.

या ऐतिहासीक सोहळ्यावेळी मोदींनी देशाला संभोदीत करताना प्रथम 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समस्त देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना सारख्या महामारीला सामोरे जाताना देशाने जो संयम दाखवला तयाबद्दल सर्वांचे आभारही मानले. आज या सोहळ्यात टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू देखील उपस्थित होते आणि त्यांचेच अभिनंदनकरताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणातच टाळ्या वाजवत या सर्व ऑलिम्पिक खेळाडूंचा सम्मान केला तसेच त्यांचे अभिनंदन करताना त्यांनी खेळाडूंनी फक्त आमचे मनचं जिंकली नाहीत तर देशाला नवीन प्रेरणा दिली आहे असे कौतुक देखील केले आहे.

आता सबका प्रयास म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन नारा

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि आता सबका प्रयास असा नवीन नाराही दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाच्या काळात देशातील डॉक्टर, शास्त्रज्ञांनी लस बनवण्याचे काम केले, करोडो लोकांनी क्षणोक्षणी लोकसेवा केली. आज देशाच्या अनेक भागात पूर, भूस्खलन होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, देश त्यांना आज आठवतो आहे .

आपला देश आजही फाळणीच्या वेदना सहन करत आहे

त्याचबरोबर त्यांनी फाळणीचे दुखणे अजूनही भारताच्या छातीला भेदत आहे, हे गेल्या शतकातील सर्वात मोठे शतक आहे. भारताने ठरवले आहे की दरवर्षी 14 ऑगस्ट आता विभाजन विभीषिका मेमोरियल डे म्हणून स्मरणात राहील. फाळणीच्या वेळी ज्यांनी अत्याचार सहन केले, आता त्या लोकांचा आदर केला जाईल.असे सांगत फाळणीबाबतची खंत व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना काळ अनेक आव्हानांसह आला, देशाने या अडचणींचा एकत्रितपणे सामना केला. ही आपली ताकद आहे की आज आपल्याला लसीसाठी कोणत्याही परदेशी देशावर अवलंबून राहावे लागले नाही, भारताकडे स्वतःची लस नसती तर काय झाले असते. पोलिओची लस मिळवण्यासाठी भारताला अनेक वर्षे गमवावी लागली, पण एवढ्या मोठ्या संकटाच्या वेळी आपल्या शास्त्रज्ञांनी इतिहास घडवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com