Framer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: मोठा झटका! शेतकऱ्यांना परत करावे लागणार 2000 रुपये, यादी जाहीर

PM Kisan Scheme Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये वर्ग केले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये वर्ग केले जात आहेत. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, मात्र आता अनेक लाभार्थ्यांना 2000 रुपये परत करावे लागणार आहेत. यासाठी शासनाकडून यादीही जारी करण्यात आली आहे.

2000 रुपये परत करावे लागतील

केंद्र सरकारने सांगितले की, देशभरातील सर्व अपात्र शेतकऱ्यांना (Framer) पीएम किसान योजनेचे 2000 रुपये परत करावे लागतील. अनेक शेतकऱ्यांना सरकारने अपात्र घोषित केले असून, त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागणार आहेत.

पैसे कोठे परत करणार?

डीबीटी अ‍ॅग्रीकल्चरच्या वेबसाइटनुसार, आयकर जमा करणारे शेतकरी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव पात्र ठरु न शकलेले शेतकरी सरकारकडून अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता या सर्व लोकांना हप्त्याचे पैसे परत करावे लागतील. अपात्र लाभार्थ्यांना खाली दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे परत करावे लागतील.

आयकरामुळे अपात्र शेतकऱ्यांचे पैसे कोठून परत करणार?

ज्या शेतकऱ्यांना आयकर भरल्यामुळे पैसे परत करावे लागतात. त्या लोकांना या खाते क्रमांक 40903138323 आणि IFSC - SBIN0006379 वर पैसे परत करावे लागतील.

इथे इतर लोकांना पैसे हस्तांतरित करा

याशिवाय, जे शेतकरी इतर कारणांमुळे अपात्र ठरले आहेत, त्यांना त्यांच्या हप्त्याची रक्कम खाते क्रमांक 4090314046 आणि IFSC कोड SBIN0006379 वर हस्तांतरित करावी लागेल.

यादी पाहा

तुम्ही तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइट https://dbtagriculture.bihar.gov.in/ ला भेट देऊन ही यादी तपासू शकता. आता यानंतर तुम्हाला पीएम किसान (PM Kisan) कर अपात्र शेतकरी वर क्लिक करावे लागेल. इथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT