PM Kisan Samman Nidhi: सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पावले उचलणे हा या योजनांचा उद्देश आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाही राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारमार्फत दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यातच आता या योजनेबाबत सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांची संख्या
खरं तर, सरकारच्या वतीने घोषणा करताना पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यावर चार महिन्यांत तीन समान हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये वर्ग केले जातात आणि वर्षभरात सहा हजार रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात.
10 कोटींहून अधिक लाभार्थी
केंद्र सरकारचे (Central Government) म्हणणे आहे की, '2019 च्या सुरुवातीच्या काळात पहिल्या हप्त्याच्या कालावधीत लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती. आता मात्र ही संख्या वाढली आहे. आता हा आकडा 10 कोटींच्या पुढे गेला असून अशा प्रकारे लाभार्थ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे.'
आरोप केले
वास्तविक, या योजनेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वतीने सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. प्रत्येक हप्त्यासोबत लाभार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. खर्गे यांच्या आरोपानंतरच हा आकडा सरकारने शेअर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.