PM Kisan Scheme  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या तारखेला खात्यात येतील इतके पैसे

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता वर्ग केला आहे, मात्र अजूनही अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ते जाणून घ्यायचे असेल तर...

या 2 कारणांमुळे पैसे मिळाले नाहीत

ज्या शेतकऱ्यांचे (Farmers) EKYC झाले नव्हते, त्यांच्या खात्यावर पैसे पोहोचलेले नाहीत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे eKYC करुनही पैसे मिळाले नाहीत, त्याचे कारण म्हणजे लॅंड साईडिंग.

फसवणूक रोखण्यासाठी सुविधा सुरु केली

पीएम किसान योजनेंतर्गत होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) कठोर कारवाई केली आहे. देशातील लाखो अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत होते. हे टाळण्यासाठी सरकारने eKYC ची सुविधा सुरु केली आहे.

लँड साइडिंग कसे शोधावे

सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर जा (https://pmkisan.gov.in/). यानंतर तुम्हाला लाभार्थी स्टेटस (https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx) वर क्लिक करावे लागेल. आता इथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर फॉर्म भरुन सबमिट करावा लागेल.

30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात पैसे येतील

12 व्या हप्त्याचे पैसे 30 नोव्हेंबरपर्यंत चालू राहतील. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या लँड साइडिंग झालेले नाही, ते त्यांच्या जवळच्या कृषी केंद्रावर जावून डॉक्युमेंट अपडेट करु शकतात.

17 ऑक्टोबर रोजी पैसे हस्तांतरित केले

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. आत्तापर्यंत देशभरातील 2 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे 2000 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पीएम मोदींनी 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Revolutionary Goans Party Dispute: 'आरजी'त उडाला राजकीय भडका! पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत 10 बड्या पदाधिकाऱ्यांचे थेट निलंबन; वीरेश बोरकर गट आक्रमक

"प्रामाणिकपणे काम करुनही कोर्टात वारंवार अपमान!", 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणी ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Horoscope 17 June 2026: बुधवारी ग्रहांचा चमत्कार! नशिबाचं चक्र फिरणार; 'या' राशींच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

SCROLL FOR NEXT