PM Kisan: 12 व्या हप्त्याचे पैसे खात्यात आले नाहीत? मग इथे करा तक्रार अन् घ्या लाभ

PM Kisan 12th Installment Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता जारी केला आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता जारी केला आहे. त्यामुळे 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत. केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2022 अंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही तात्काळ केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करु शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया...

तक्रार कुठे आणि कशी करायची?

जर तुमच्या खात्यात 2000 रुपये आले नसतील तर तुम्ही प्रथम तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

- जर या अधिकाऱ्यांनी तुमचे म्हणणे ऐकले नाही किंवा त्यानंतरही खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही संबंधित हेल्पलाइनवर कॉल करु शकता.

हा डेस्क (PM-KISAN Help Desk) सोमवार ते शुक्रवार चालू असतो.

याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही संपर्क साधू शकता.

- तरीही काम करत नसल्यास 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) या क्रमांकावर कॉल करा.

PM Kisan Yojana
PM Kisan: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 12 वा हप्ता खात्यात झाला जमा; त्वरित तपासा

कृषी मंत्रालयाकडे तक्रार करा

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक (Bank) खात्यात पोहोचत नसतील, तर त्याचे त्वरित निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर पैसे पोहोचले नसतील किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त केली जाईल.

तुम्ही देखील संपर्क करु शकता

तुम्ही घरबसल्या या योजनेची स्थिती सहज तपासू शकता आणि अर्जही करु शकता. तुम्ही या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. त्याचा दिल्लीतील फोन नंबर 011-23382401 आहे, तर ई-मेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 12 वा हप्ता खात्यात झाला जमा; त्वरित तपासा

मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे (कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक)

पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com