PM Kisan  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: सरकारकडून आर्थिक मदत हवी का? लगेच करा नोंदणी; खात्यात येतील पैसे

PM Kisan Update: शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Update: शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यासोबतच सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे कल्याण हा या योजनांचा उद्देश आहे. त्याच वेळी, पीएम किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) देखील सरकारद्वारे चालवली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये शासनाकडून दिले जातात. तरीही अनेक शेतकरी शासनाच्या या योजनेपासून वंचित आहेत.

दरम्यान, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळावा अशी सरकारची इच्छा आहे. अशा परिस्थितीत शेतकरी (Farmer) पीएम किसान योजनेसाठी स्वतःची नोंदणी करुन लाभ घेऊ शकतात.

तसेच, PM-KISAN ही एक प्रमुख केंद्रीय योजना आहे, जी पात्र शेतकरी कुटुंबांसाठी 2019 मध्ये सुरु करण्यात आली. पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये देण्याची योजना सुरु करण्यात आली. दुसरीकडे, नवीन शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. Farmers Corner येथे New Farmer Registration वर क्लिक करा. आता Rural Farmer Registration किंवा Urban Farmer Registration चा ​​पर्याय निवडून तुमचा आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि राज्य निवडा. यानंतर Captcha Code टाका आणि Get OTP वर क्लिक करा. - आता OTP टाकून पुढे जा - यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, बँक (Bank) तपशील आणि वैयक्तिक तपशील भरा.

शिवाय, आधार कार्डानुसार (Aadhar Card) तुमची पुढील माहिती भरा. यानंतर आता Submit For Aadhaar Authentication वर क्लिक करा. तुमचे Aadhaar Authentication पूर्ण झाल्यावर तुमच्या जमिनीची माहिती द्या, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि save वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. ज्यामध्ये कन्फर्मेशन आणि रिजेक्शनची माहिती दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT