PM Kisan: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, 13 व्या हप्त्याची तारीख निश्चित! PM मोदी म्हणाले...

PM Kisan 13th Installment: 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak

PM Kisan 13th Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पीएम मोदींनी अलीकडेच पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी केला आहे. यासह, 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत. आता या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. नवीन अपडेट जाणून घेऊया.

दरम्यान, केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना सरकारच्या सर्वात महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. आणि याच कारणामुळे या योजनेबाबत स्वत: पंतप्रधान मोदींनी अनेक व्यासपीठांवरुन शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शेतकर्‍यांसाठी ट्विट करुन म्हटले होते की, 'देशाला आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. ते जितके बलवान असतील तितका समृद्ध न्यू इंडिया असेल. मला आनंद आहे की, पीएम किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकर्‍यांना (Farmer) नवीन बळ देत आहेत.'

PM Kisan Yojana
PM Kisan: PM किसानच्या 13 व्या हप्त्यापूर्वी आली मोठी बातमी, तुम्हीही म्हणाल...

तेराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?

आता पुढच्या हप्त्याबद्दल बोलूया. पीएम किसानचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे. वास्तविक, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. त्यानुसार पीएम किसानचा (PM Kisan) 13वा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

तात्काळ अपडेट करा

  • या योजनेअंतर्गत तुम्हाला काही समस्या येत असल्यास, ते लवकर सोडवा.

  • यासाठी हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन किंवा मेल आयडीवर मेल करुन तुम्ही उपाय काढू शकता.

  • पीएम किसानचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

  • तुम्ही तुमची तक्रार इमेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर पाठवू शकता.

  • तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसेल तर अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करा.

PM Kisan Yojana
PM Kisan: 13 व्या हप्त्यापूर्वी PM मोदींची शेतकऱ्यांना भेट, खात्यात येणार 15 लाख

याप्रमाणे स्टेटस तपासा

1. यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

2. यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.

3. आता लाभार्थी स्टेटस पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

5. इथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com