PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: पीएम किसानबाबत मोठी अपडेट, 15 ऑक्टोबरपर्यंत 'या' 3 गोष्टी करा... नाहीतर 2000 रुपये विसरा

PM Kisan 15th Installment Update: तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.

Manish Jadhav

PM Kisan 15th Installment Update: तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, मात्र 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmer) लवकरात लवकर 3 कामे पूर्ण करायची आहेत.

ही कामे पूर्ण करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. पीएम किसान (PM Kisan 15th Installment Update) च्या 15 व्या हप्त्याची रक्कम सरकार फक्त त्या लाभार्थी शेतकर्‍यांनाच देईल, ज्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत तीन कामे पूर्ण केली आहेत.

7 दिवस शिल्लक आहेत

पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी (PM Kisan e-KYC) करुन घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अजून KYC (e-KYC) केले नसेल, तर पुढील हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. याशिवाय, जमिनीची तारीख पेरणीची माहिती द्यावी लागेल.

तसेच तुम्हाला तुमचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागेल. हे काम शेतकऱ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत करायचे आहे. आता ही कामे करण्यासाठी तुमच्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत.

तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही

पीएम किसान योजनेच्या (PM Kisan 15th Installment) लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तुमची केवायसी झाली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकेल

शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ नोव्हेंबरमध्ये किंवा त्यापूर्वी कधीही मिळू शकतो. सध्या, पुढील हप्ता जारी करण्याच्या तारखेबद्दल सरकारकडून (Government) कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या

याशिवाय, 15 व्या हप्त्याच्या स्थितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला देखील भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT