Money Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Jeevan Jyoti Bima Yojana अन् सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम महागला, जाणून घ्या

PMJJBY and PMSBY Scheme: सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) योजनांमध्ये सुधारणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

PM Jeevan Jyoti Bima Yojana/ PM Suraksha Beema Yojana: तुम्हीही पीएम जीवन ज्योती योजना किंवा पीएम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केली असेल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 7 वर्षांनंतर, सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये (PMSBY) सुधारणा केली आहे. यानंतर दोन्ही प्लॅनचा प्रीमियम वाढला आहे.

दरम्यान, दोन्ही प्लॅनच्या प्रीमियममध्ये 1.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करुन तुम्ही पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुमचे सरकारी बँकेत (Bank) खाते असले पाहिजे.

आता तुम्हाला एका वर्षात 456 रुपये द्यावे लागतील

तुमचे सरकारी बँकेत खाते असल्यास तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकता. या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूकीची (Investment) रक्कम खूपच कमी आहे. याआधी या दोन्ही योजनांमध्ये BS 342 ची गुंतवणूक करावी लागत होती, परंतु आता सरकारने (Government) प्रीमियम वाढवल्यानंतर, दोन्ही योजना एकत्र केल्यास, तुम्हाला संपूर्ण वर्षात केवळ 456 रुपये जमा करावे लागतील. या दोन्ही योजनांबद्दल जाणून घेऊया...

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या मृत्यूवर नामांकित व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात. 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. यापूर्वी, या योजनेसाठी तुम्हाला फक्त 330 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागत होता, जो आता वाढवून 436 करण्यात आला आहे. ही मुदत विमा पॉलिसी आहे. विशेष म्हणजे, हा विमा एका वर्षासाठी आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंग झाल्यास, 2 लाख रुपयांची भरपाई उपलब्ध आहे.

  • या योजनेअंतर्गत, जर विमाधारक अंशतः किंवा कायमचा अपंग झाला असेल तर त्याला 1 लाख रुपयांचे संरक्षण मिळते.

  • यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती संरक्षण घेऊ शकते.

  • या प्लॅनचा वार्षिक प्रीमियम पूर्वी फक्त 12 रुपये होता, तो आता 20 रुपये करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT