LIC Jeevan Umang Policy: LIC ग्राहकांसाठी मोठी बातमी, वर्षाला मिळणार 36 हजार रुपये!

LIC Plan List: LIC च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे.
LIC Policy
LIC Policy Dainik Gomantak
Published on
Updated on

LIC Insurance Policy: LIC च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी जबरदस्त योजना देत असते. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करु शकता. LIC ची अशीच एक खास योजना आहे - जीवन उमंग पॉलिसी, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकता.

चला तर मग या अप्रतिम योजनेबद्दल जाणून घेऊया... जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळवायचा असेल तर LIC जीवन उमंग पॉलिसी तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. अगदी कमी गुंतवणुकीसह (Investment), तुम्हाला 36,000 रुपये वार्षिक परतावा मिळू शकतो.

LIC Policy
LIC Policy: LIC ची सुपरहिट योजना! 233 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळवा 17 लाख

या योजनेबद्दल जाणून घ्या

एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी इतर योजनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. यामध्ये, लाइफ कव्हरसह मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम उपलब्ध आहे. मुदतपूर्तीनंतर दर वर्षी तुमच्या खात्यात निश्चित उत्पन्न येईल.

दुसरीकडे, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळेल. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते 100 वर्षांपर्यंतचे कव्हरेज प्रदान करते.

LIC Policy
LIC Policy: मोठी बातमी! मुलीच्या लग्नावर LIC देणार पूर्ण 27 लाख रुपये, जाणून घ्या प्लान?

वर्षाला 36 हजार रुपये मिळतील

या पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा 1350 रुपये प्रीमियम भरल्यास, एका वर्षात ही रक्कम 16,200 रुपये होते. जर ही पॉलिसी 30 वर्षे चालवली तर रक्कम सुमारे 4 लाख 86 हजार रुपयांपर्यंत वाढते. तुमच्या गुंतवणुकीवर 31 व्या वर्षापासून कंपनी तुम्हाला दरवर्षी 36 हजारांचा परतावा देण्यास सुरुवात करते.

LIC Policy
LIC Premium Payment: LIC प्रीमियम ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पॉलिसीधारकाला टर्म रायडरचाही लाभ मिळतो

या पॉलिसी अंतर्गत, गुंतवणूकदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास टर्म रायडर बेनिफिट देखील उपलब्ध आहे. या पॉलिसीवर बाजारातील जोखमीचा परिणाम होत नाही. मात्र या पॉलिसीवर एलआयसीच्या नफा-तोट्याचा परिणाम नक्कीच होतो. आयकर कलम 80C अंतर्गत ही पॉलिसी घेतल्यावर कर सूट देखील उपलब्ध आहे. जर एखाद्याला जीवन उमंग पॉलिसीची योजना घ्यायची असेल तर त्याला किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com