Framer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट, केंद्रीय मंत्र्याने सांगितला फॉर्म्युला

PM Narendra Modi: देशातील 14 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: देशातील 14 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. हे पाहता मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनाही सुरु केल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी ही सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. याशिवाय प्रधानमंत्री विमा फसल योजना, पशुपालनाला चालना देण्यासाठी विविध योजना आणि किसान क्रेडिट कार्डद्वारे सहज कर्ज मिळणे यासारख्या सुविधांचा सरकारकडून समावेश करण्यात आला आहे.

संशोधन आणि मानकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे

शेतकऱ्यांचे (Framer) उत्पन्न दुप्पट करण्याची सरकारची योजना आहे. हे लक्षात घेऊन, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी निर्यातीला चालना देण्यासाठी बाजरीसाठी नवीन बाजारपेठ शोधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अधिक संशोधन आणि मानकांवर भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. बाजरीवरील आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेत्याच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, 'आपण नवीन बाजारपेठा शोधल्या पाहिजेत. नवीन वाण आणण्यासाठी संशोधनाची गरज आहे.'

तसेच, भरड तृणधान्याची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्याबरोबरच मंत्र्यांनी उद्योगाच्या मोठ्या सहभागाबद्दलही सांगितले. भरडधान्याची निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. या योजनेत केंद्र सरकारकडून (Central Government) शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून लवकरच 13 व्या हप्त्याचे पैसेही खात्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT