500 Currency Dainik Gomantak
अर्थविश्व

PIB Fact Check: 500 रुपयांची नोट अन् आधार कार्ड बंद होणार? पीआयबीने सांगितले संपूर्ण सत्य...

PIB Fact Check News: सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पाहायला मिळत आहेत. यासोबतच अनेक यूट्यूब चॅनल फेक न्यूज दाखवत आहेत.

Manish Jadhav

PIB Fact Check News: केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात अनेक योजना राबवण्यात येत असून, त्यामध्ये सरकार आर्थिक मदतीपासून ते मोफत उपचारापर्यंत अनेक सुविधा देत आहे.

त्याचवेळी, सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पाहायला मिळत आहेत. यासोबतच अनेक यूट्यूब चॅनल फेक न्यूज दाखवत आहेत, ज्याबद्दल केंद्र सरकारने सर्वांना सतर्क केले आहे. PIB द्वारे खोट्या बातम्यांचे तथ्य तपासले जाते.

पीआयबीने माहिती दिली

पीआयबीने सांगितले की, सध्या Educational Dost नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे जे खोट्या बातम्या पसरवत आहे.

पीआयबीने सत्यता तपासून सांगितले की, अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

आधार कार्ड आणि 500 रुपयांवर बंदी घालण्यात आली आहे

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये सांगितले आहे की, या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला, ज्यामध्ये दावा केला की, 500 रुपयांची नोट आणि आधार कार्डवर भारतात बंदी घालण्यात येईल.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पीआयबीने तथ्य तपासले आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले.

>> ही पोस्ट बनावट असल्याचे पीआयबीने म्हटले आहे.

>> यासोबतच असे फेक व्हिडिओ कोणाशीही शेअर करु नका, असे सरकारने म्हटले आहे.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका

केंद्र सरकारने (Central Government) पुढे म्हटले आहे की, असे मेसेज कोणाशीही शेअर करु नका.

यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

तुम्ही देखील सत्यता शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करु नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करु नका.

तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT