Fact Check: 30,000 पेक्षा जास्त रक्कम असलेले खाते होणार बंद? RBI गव्हर्नरांनी दिली मोठी अपडेट

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेकडून बँकांबाबत वेळोवेळी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
Shaktikanta Das
Shaktikanta DasDainik Gomantak

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेकडून बँकांबाबत वेळोवेळी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. बँका आणि ग्राहकांबाबत आरबीआय गव्हर्नरने नवे नियम बनवले आहेत.

आता एक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी घोषणा केली आहे की जर तुमच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. हा व्हायरल मेसेज पाहिल्यानंतर ग्राहकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत.

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली

दरम्यान, हा व्हायरल मेसेज पाहिल्यानंतर पीआयबीने त्याची सत्यता तपासली आहे. ज्यामध्ये आरबीआय गव्हर्नर दास यांनी अशा कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही.

Shaktikanta Das
RBI Imposes Penalty: HDFC आणि HSBC नंतर RBI ने 'या' बँकाना ठोठावला दंड, तुमचे खाते त्यात आहे का?

पीआयबीने ट्विट केले आहे

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, एका बातमीमध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने बँक खात्यांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे की जर कोणत्याही खातेदाराच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यांचे बंद केले जाईल.

>> पीआयबीने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

>> आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

Shaktikanta Das
Rs 500 Fake Currency: 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBI चं वाढलं टेंशन!

फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे मेसेज कोणाशीही शेअर करु नयेत. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

तुम्ही व्हायरल मेसेजचे फॅक्ट चेक करु शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करु नका, असे केंद्र सरकारकडून (Government) सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करु नका. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com