Petrol-diesel price will be low Modi government considering reducing excise duty  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! मोदी सरकार उत्पादन शुल्क कमी करण्याच्या विचारात

पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

दैनिक गोमन्तक

Petrol-Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे. वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा कृतीत उतरले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. (Petrol-diesel price will be low Modi government considering reducing excise duty)

मात्र, हा दिलासा केवळ तात्पुरता दिला जाणार आहे. माहितीनुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (Ministry of Petroleum and Natural Gas) तेलावरील उत्पादन शुल्काबाबत वित्त मंत्रालयाशी चर्चा करत आहे. पेट्रोलियम आणि अर्थ मंत्रालय (Finanace Ministry) यांच्यातील ही चर्चा यशस्वी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-diesel price) तातडीने कपात होऊ शकते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते.

नोव्हेंबर 2021 मध्ये देखील केंद्राने (Central Government) तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यावेळी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅटमध्येही कपात केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. अर्थमंत्रालयाने गेल्या वर्षी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, उत्पादन शुल्कातून सरकारला पेट्रोलवर प्रति लिटर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये प्रतिलिटर मिळत होते.

एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढू शकतात!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. एलपीजीच्या किमतींवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. मात्र, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत किती वाढणार हे अद्याप ठरलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT