ऑटो-कॅबचा प्रवास महागला, ओला-उबरने वाढवले 12 टक्क्यांनी भाडे

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) गगनाला भिडलेल्या किमतींनी सर्वसामान्यांना हैराण केले आहे.
Uber
UberDainik Gomantak
Published on
Updated on

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी सर्वसामान्यांना हैराण केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये त्याचा फटका आता ऑटो कॅबलाही बसला आहे. पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीचा थेट परिणाम भाड्यावर झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR), ओला आणि उबेर सारख्या टॉप कॅब एग्रीगेटर्सनी कॅब फेअरमध्ये मोठी वाढ केली आहे. दोन्ही कंपन्यांनी 12 टक्क्यांनी भाडे वाढवले आहे. हे दोन्ही अ‍ॅप-आधारित एग्रीगेटर राजधानी आणि त्याच्याशी संबंधित शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. विशेष म्हणजे त्यांच्या सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत.

दरम्यान, उबरने सोमवारी एक निवेदन जारी करत म्हटले की, तेलाच्या वाढत्या किमती "चिंता वाढवत आहेत" आणि कंपनीने "हे लक्षात घेऊन पुढील पावले उचलेल."

Uber
'यांना' पीएम किसानचा आगामी 11 वा हप्ता मिळणार नाही

उबेर इंडिया आणि दक्षिण आशियाचे सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख नितीश भूषण म्हणाले, "आम्ही चालकांकडून अभिप्राय घेतला आहे. त्यानंतर आम्हाला समजले आहे की, सध्याच्या वाढत्या तेलाच्या किमती चिंता वाढवत आहेत. अशा वेळी चालकांना दिलासा देण्यासाठी उबरने दिल्ली-एनसीआरमध्ये 12 टक्क्यांनी भाडे वाढवले ​आहे. 'आम्ही येत्या आठवड्यात तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवू आणि आवश्यकतेनुसार निर्णय घेऊ,' असेही निवेदनात म्हटले आहे.

Uber
PM Kisan: असा मिळवा पीएम किसानचा न मिळालेला हप्ता

एका महिन्यात सीएनजीच्या दरात 10 वेळा वाढ झाली

या महिन्यातच सीएनजीचे दर चार वेळा वाढले असताना ही वाढ झाली आहे. गेल्या वेळी 7 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती, जी गेल्या एका महिन्यातील 10 वी दरवाढ होती. गेल्या आठवड्यातच दिल्लीतील ऑटो आणि कॅब चालकांनी सीएनजीच्या किमतींविरोधात निदर्शने करत अनुदानाची मागणीही केली होती.

याशिवाय, दिल्लीत (Delhi) सध्या CNG 69.11 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. 7 मार्च 2022 रोजी ही किंमत 13.1 रुपये होती. ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी 71.67 रुपये प्रति किलो आणि गुरुग्राममध्ये 77.44 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com