Paytm plan to sell bitcoin cryptocurrency on Online app  Dainik Gomantak
अर्थविश्व

Paytm वर विकत घेता येणार बिटकॉइन, कधी आणि कसे जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

डिजिटल पेमेंट्स (Digital Payment) आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम (Paytm) IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात प्रवेश करणार आहे.कंपनीचा IPO सुमारे 18 हजार कोटी रुपयांचा असेल जो या सोमवारी लाँच होणार आहे. दरम्यान, अशातच पेटीएमच्या एका अधिकाऱ्याने पेमेंट अॅपवर (Online Payment App) क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) देखील विकले जाईल असे सांगून बाजारात एकच खळबळ उडवून दिली आहे. मात्र, त्याची विक्री रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतरच होईल.RBI ने याबाबत अजून मंजुरी दिली नाही. (Paytm plan to sell bitcoin cryptocurrency on Online app)

पेटीएमचे सीएफओ मधुर देवरा यांनी एका मुलाखतीत सांगितले की जर सरकारने परवानगी दिली तर ते आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बिटकॉइनची विक्री करेल. या चलनावर अजूनही बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. जर त्याची खरेदी देशात पूर्णपणे कायदेशीर झाली, तर पेटीएम त्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करेल. आरबीआयने मार्च 2020 मध्ये यावर बंदी घातली होती. मात्र, सरकार त्यासाठी तयार नव्हते. पण आरबीआय त्यावर बंदी घालण्याचा सल्ला देत असे.

दरम्यान, पेटीएमने त्याच्या प्रारंभिक शेअर विक्रीपूर्वी बुधवारी अँकर गुंतवणूकदारांकडून 8,235 कोटी रुपये उभे केले आहेत. पेटीएमने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांनी अँकर गुंतवणूकदार फेरीत ब्लॅकरॉक, सीपीपी गुंतवणूक मंडळ, बिर्ला एमएफ आणि इतर गुंतवणूकदारांकडून निधी उभारला आहे.

Paytm मध्ये ब्लैकरॉक ने 1,045 कोटी, कॅनडा पेन्शन स्कीम इन्व्हेस्टमेंट बोर्डने रु. 938 कोटी आणि GIC ने रु. 533 कोटी रुपये गुंतवले आहेत गुंतवले आहेत.कंपनीचा IPO 8 नोव्हेंबर रोजी येणार असून इक्विटीसाठी शेअरची किंमत 2,080-2,150 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म कंपनी पेटीएमने सांगितले आहे की कंपनी आता 18300 कोटी रुपयांचा IPO आणणार आहे. यापूर्वी बाजार नियामक सेबीने 16600 कोटींचा IPO मंजूर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची सर्वात मोठी शेअरहोल्डर अलीबाबा ग्रुप फर्म अँट फायनान्शियल्स आणि सॉफ्टबँकसह इतर विद्यमान गुंतवणूकदारांनी पेटीएममधील त्यांचे बहुसंख्य हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

तर बाजारात सूचिबद्ध झाल्यामुळे, Paytm भारतातील सर्वोच्च 50 सर्वोच्च कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होईल. 2150 या किमतीनुसार कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये असेल. या मूल्यांकनावर आधारित, ती देशातील 36 वी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी असेल.याआधी, कंपनीची योजना IPO द्वारे एकूण रु. 16,600 कोटी उभारण्याची होती, ज्यामध्ये रु. 8,300 कोटींचा नवीन इश्यू आणि रु. 8,300 कोटींचा ओपन फॉर सेलचा समावेश होता. विद्यमान शेअरधारकांनी अधिक हिस्सा विकण्याच्या निर्णयामुळे OFS चा आकार रु. 1,700 कोटींनी वाढून रु. 10,000 कोटी रुपये होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT