OYO Dainik Gomantak
अर्थविश्व

OYO To Layoff: आता OYO देणार कर्मचाऱ्यांना नारळ!

OYO To Layoff: कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत एकामागून एक बड्या कंपन्यांची नावे आल्यानंतर त्यात आत ओयोचेही नाव जोडले गेले आहे.

दैनिक गोमन्तक

OYO To Layoff: कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत एकामागून एक बड्या कंपन्यांची नावे आल्यानंतर त्यात आत ओयोचेही नाव जोडले गेले आहे. ओयो सुद्धा आपल्या कर्मचार्‍यांना कमी करणार आहे. कंपनीच्या संरचनेत झालेल्या बदलामुळे ओयो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा मार्ग अवलंबत आहे. ओयोने या प्रक्रियेसाठी सुमारे 600 कर्मचाऱ्यांची निवड करण्याची तयारी केली असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

म्हणजेच, लवकरच कंपनी आपल्या काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. सध्या OYO मध्ये काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची (Employees) संख्या 4000 आहे. याचा अर्थ Oyo आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते.

OYO काही नवीन बदल करणार

वास्तविक Oyo कंपनीमध्ये काही नवीन बदल करण्याचा विचार करत आहे. या बदलांतर्गत काही विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे, तर काही विभागांचे विलीनीकरणही होऊ शकते. असे मानले जाते की, कंपनी काही नवीन भरती देखील करु शकते. याआधी 2020 मध्येही कंपनी चर्चेत आली होती, जेव्हा कंपनीतून सुमारे 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते.

या विभागातील कर्मचारी कमी होऊ शकतात

अहवालात दावा करण्यात आला की, कंपनीची नजर टेक सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडू शकते. कर्मचार्‍यांना काढून टाकण्याव्यतिरिक्त, कंपनी काही नवीन भरती देखील करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT