Foxconn-Vedanta Deal Dainik Gomantak
अर्थविश्व

Foxconn-Vedanta Deal: सेमीकंडक्टर बनवण्याचे वेदांतचे स्वप्न भंगले, फॉक्सकॉनने मोडली भागीदारी

Foxconn: तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सेमीकंडक्टरसाठी वेदांतसोबतची भागीदारी मोडली आहे. गेल्या वर्षी दोन्ही कंपन्यांनी हा करार केला होता.

Manish Jadhav

Foxconn-Vedanta Deal: भारतात सेमीकंडक्टर बनवण्याच्या वेदांताच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सेमीकंडक्टरसाठी वेदांतसोबतची भागीदारी मोडली आहे.

गेल्या वर्षी दोन्ही कंपन्यांनी हा करार केला होता. हा करार एकूण 19.5 अब्ज डॉलर्सचा होता. या करारांतर्गत वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी मिळून गुजरात, भारतामध्ये $19.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये सेमीकंड्क्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन प्लांट उभारण्याची घोषणा केली होती.

गुजरातमध्ये गुंतवणूक करायची होती

या करारांतर्गत वेदांत आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन यांनी मिळून गुजरातमध्ये (Gujarat) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची योजना आखली होती, जी आता अडचणीत आली आहे.

प्रत्यक्षात हा करार मोडीत निघाल्याने वेदांतलाच झटका बसला नाही, तर सरकारच्या या योजनेलाही धक्का बसला आहे. ज्या अंतर्गत सरकारला भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे होते.

करार का मोडला

वास्तविक, हा करार तुटण्याबाबत आधीच अटकळ बांधली जात होती. याचे कारण म्हणजे तैवानची कंपनी फॉक्सकॉनने नवीन पार्टनर शोधण्यास सुरुवात केली आहे.

एकीकडे, फॉक्सकॉनची वेदांतसोबतची भागीदारी, दुसरीकडे त्याचवेळी दुसऱ्या जोडीदाराचा शोध सुरु होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल आणि तैवानची (Taiwan) कंपनी यांच्यातही याबाबत मतभेद सुरु झाले होते. आता हा करार तुटल्याचे मानले जात आहे.

तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्याने हे सांगितले होते

त्याचवेळी, गेल्या जूनमध्ये ईटीच्या अहवालात एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते की, वेदांत आणि फॉक्सकॉनमध्ये मतभेद आहेत. पण आम्ही दोघांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

असे असूनही, आम्ही फॉक्सकॉनला वेगळा भागीदार शोधण्याचा सल्ला दिला आहे. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्याने म्हटले होते की, केंद्र सरकार वेदांत समूहाच्या आर्थिक स्थैर्याबद्दल चिंतेत आहे.

दुसरीकडे, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले की, "वेदांतासोबतच्या JV मधून माघार घेण्याच्या फॉक्सकॉनच्या या निर्णयाचा भारताच्या सेमीकंडक्टर फॅब उद्दिष्टांवर कोणताही परिणाम होणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT