Demat Accounts Increasing
Demat Accounts Increasing Dainik Gomantak
अर्थविश्व

Demat Accounts Increasing: देशात 3 महिन्यात 48 लाखाहून अधिक नवीन डीमॅट अकाऊंट्स सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Dmat Accounts Increasing: भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढत चालला असून त्याचा प्रत्यय गत तिमाहीतील आकडेवारीवरून येत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशात 48 लाखाहून अधिक डीमॅट अकाऊंट सुरू करण्यात आली आहेत.

आशिया खंडातील पहिला आणि एकमेव लिस्टेड डिपॉझिटरी असलेल्या सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेस (CDSL) ने नुकतीच ही माहिती दिली आहे. CDSL ने ऑगस्ट महिन्यात 7 कोटी डीमॅट अकाऊंट्सच्या नोंदणीचा टप्पा ओलांडला आहे. असे करणारी ही पहिली डिपॉझिटरी संस्था बनली आहे.

CDSL ने 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या सहामाहीचे आर्थिक ताळेबंद जाहीर केला होता. यावेळी सीडीएसएलच्या एकुण उत्पन्नात दरवर्षी 7 टक्के वाढ होऊन हे उत्पन्न आता 316 कोटी रूपये झाले आहे. तर निव्वळ नफा 8 टक्क्यांनी कमी होऊन 138 कोटी रूपये झाला आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत CDSL चे उत्पन्न 3 टक्के वाढून १७० कोटी रूपये झाले आहे. तर निव्वळ नफा 7 टक्क्यांनी घटून ८० कोटी राहिला आहे.

काय काम करते CDSL?

गुंतवणुकदारांचे शेअर्स, बाँड, डिबेंचर आणि सिक्युरिटीज हे सर्व दस्तऐवज कागदपत्रांऐवजी इलेक्ट्रॉनिक रूपात सुरक्षित ठेवण्याचे काम CDSL ही डिपॉझिटरी संस्था करते. ही डिपॉझिटरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) साठी काम करते. CDSL ला शेअर्सची बँक म्हणून ओळखले जाते.

डीमॅट अकाऊंट कसे उघडले जाते?

CDSL आणि NSDL अशा दोन डिपॉझिटरीकडे डीमॅट अकाऊंटची नोंदणी होत असते. त्यासाठी कुठल्याही ब्रोकरेज संस्थेकडे ट्रेडिंग अकाऊंट सुरू करता येऊ शकते. ब्रोकरेज संस्थेकडे डी मॅट अकाऊंट सुरू केल्यास ब्रोकरचे काम ती संस्थाच करेल. डी मॅट अकाऊंटसाठी पॅन कार्ड, बँक अकाऊंट, ओळखपत्र, पत्त्याचा प्रुफ ही कागदपत्रे लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT