Bank खात्यात पैसे नाहीत? तरीही तुम्ही काढू शकता 10,000 रुपये, लगेच जाणून घ्या

PM Jan Dhan Khata: तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

PM Jan Dhan Khata: तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत आता झिरो बॅलन्स असलेल्या बँक खात्यांची संख्या वाढत आहे. या अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये खातेदारांना अनेक सुविधा मिळतात. तुमच्या बँक खात्यात शिल्लक नसली तरीही तुम्ही या खात्यातून 10,000 रुपये काढू शकता. याशिवाय, रुपे डेबिट कार्डची सुविधा दिली आहे, ज्याद्वारे तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करु शकता.

योजना 2014 मध्ये सुरु झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. ही योजना यावर्षी 28 ऑगस्ट रोजी सुरु झाली. या योजनेअंतर्गत 6 जानेवारी 2021 पर्यंत एकूण जनधन खात्यांची संख्या 41.6 कोटी झाली आहे. सरकारने (Government) या योजनेची दुसरी आवृत्ती 2018 मध्ये अधिक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह लॉन्च केली.

Money
Jan Dhan Account: जनधन खातेदारांसाठी मोठी बातमी, केंद्रीय मंत्र्यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

अनेक सुविधा उपलब्ध

  • जन धन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे खातेही उघडता येते.

  • या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.

  • यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते.

  • हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.

  • यामध्ये तुम्हाला किमान बॅलन्स राखण्याची गरज नाही.

Money
Post Office Scheme: पोस्टाने आणली तुमच्या फायद्याची स्कीम, जाणून घ्या

जन धन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जन धन खाते उघडण्यासाठी, तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह KYC ची आवश्यकता पूर्ण करणारे दस्तऐवज सबमिट करु शकता.

  • तुमच्याकडे ही कागदपत्रे नसल्यासही तुम्ही खाते उघडू शकता.

  • जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.

  • 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com