भारतीय मार्केटमध्ये मोबाईलप्रेमींसाठी फ्लॅगशिप फीचर्ससह OnePlus 13s लॉन्च करण्यात आला. या लेटेस्ट स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या क्लासिक स्मार्टफोनमध्ये गेम चेंजर प्रोसेसर, AI फीचर्स, दमदार बॅटरी आणि शानदार डिस्प्ले मिळतो. 5.5जी सपोर्ट असलेल्या या फोनच्या साइडला एक नवीन प्लसचे बटण देण्यात आले आहे. इतकेच नाहीतर कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये स्वतंत्र वाय-फाय चिप देखील वापरली गेली आहे. चला तर मग वेळ न दौडता या फोनची विक्री कधीपासून सुरु होणार आणि या फोनसोबत कोणत्या लॉन्च ऑफर्स उपलब्ध असतील? याविषयी जाणून घेऊया...
डिस्प्ले: 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेल्या OnePlus 13S स्मार्टफोनमध्ये 6.32-इंचाचा डिस्प्ले आहे जो 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट मोबाइल प्लॅटफॉर्म आहेत.
बॅटरी क्षमता: शक्तिशाली 6260mAh बॅटरीसह लॉन्च करण्यात आलेल्या या फोनला 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
कॅमेरा सेटअप: 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेऱ्यासह लॉन्च केलेल्या या नवीन फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
दरम्यान, या फोनचे दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत, 12 जीबी/ 256 जीबी आणि 12 जीबी /512 जीबी. 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 54 हजार 999 रुपये आहे तर 512 जीबी व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 59 हजार 999 रुपये मोजावे लागतील.
दुसरीकडे, हा धमाकेदार फोन ब्लॅक वेल्वेट, पिंक सॅटिन आणि ग्रीन सिल्क या तीन कलरच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. तसेच, या फोनच्या लॉन्च ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5000 रुपयांची सूट मिळेल. या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली असून हा फोन 12 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.
वनप्लसचा हा नवीन स्मार्टफोन म्हणजे सॅमसंग (Samsung) गॅलेक्सी एस24 5जी (अमेझॉनवर 8/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 51900 रुपये आहे) आणि अॅपल आयफोन 16ई (अमेझॉनवर 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 53600 रुपये आहे).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.