बाजारात धूम घालायला OnePlus 13s तयार, Samsung आणि Xiaomi साठी धोक्याची घंटा, मिळणार 'हे' फिचर्स

OnePlus 13s Specifications: OnePlus ब्रँडच्या आगामी स्मार्टफोन OnePlus 13s ची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. यातच आता, कंपनीने त्यांच्या अधिकृत साइटवर या फोनबाबत माहिती देणारे एक वेगळे पेज तयार केले आहे.
OnePlus 13s Specifications
OnePlus 13sDainim Gomantak
Published on
Updated on

OnePlus ब्रँडच्या आगामी स्मार्टफोन OnePlus 13s ची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. यातच आता, कंपनीने त्यांच्या अधिकृत साइटवर या फोनबाबत माहिती देणारे एक वेगळे पेज तयार केले आहे. हा फोन गेल्या आठवड्यात चीनी बाजारात OnePlus 13T या नावाने लॉन्च करण्यात आला. मात्र आता भारतात लॉन्च होण्यापूर्वी हा फोन ब्लॅक वेल्वेट आणि पिंक सॅटिन या दोन कलरमध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची पुष्टी झाली आहे. एवढच नाहीतर कंपनीने फोनमध्ये उपलब्ध असलेल्या काही खास फीचर्सचीही पुष्टी केली आहे.

दरम्यान, हा फोन मेटल फ्रेमसह लॉन्च केला जाऊ शकतो, इतकेच नाहीतर अलर्ट स्लायडरऐवजी हा फोन कस्टमाइझ करण्यायोग्य बटणासह लॉन्च केला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वनप्लस ब्रँडच्या या आगामी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असेल. OnePlus 13S मध्ये 6.32-इंच स्क्रीन आहे, जी त्याला एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन बनवते. वनप्लसची अधिकृत साइट ओपन करताच तुम्हाला वरच्या बाजूला नोटिफाय मी (Notify Me) हा ऑप्शन लिहिलेला दिसेल.

OnePlus 13s Specifications
Amazon Great Republic Day Sale: खास तुमच्यासाठी! OnePlus 13, 13R आणि iPhone 16 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट

दरवर्षीप्रमाणे, वनप्लस कंपनीचा हा फोन अधिकृत लाँचिंगनंतर कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर (Amazon) विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच, ऑनलाइनऐवजी हा फोन ऑफलाइन स्टोअरमध्ये देखील उपलब्ध करुन दिला जाईल.

OnePlus 13s कधी लॉन्च होणार?

सध्या, भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी OnePlus 13S कधी लॉन्च होणार हे माहित नाही. पण यासंबंधी लवकरच कळू शकते.

OnePlus 13s Specifications
OnePlus 13 Series अखेर भारतात लॉन्च! 6000 mAh बॅटरी, दमदार प्रोसेसरसह सुसज्ज; जाणून घ्या किंमत

OnePlus 13T चे फीचर्स

120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1.5 के रिझोल्यूशन सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल प्रायमरी आणि 50-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असू शकतो. तसेच, या फोनमध्ये 6260mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन 16 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंतच्या अंतर्गत स्टोरेजसह लॉन्च केली जाऊ शकते.

OnePlus 13s Specifications
OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लॉन्चपूर्वीच लीक; Android 14 सह 64MP कॅमेरा अन् बरचं काही...

OnePlus 13s ची किंमत

चीनमध्ये (China) OnePlus 13T या नावाने लॉन्च झालेल्या या फोनची सुरुवातीची किंमत 3399 चिनी युआन (सुमारे 39650 रुपये) आहे. या फोनचे टॉप मॉडेल 3999 चिनी युआन (सुमारे 46649 रुपये) आहे. जर हा फोन भारतात या किंमतीच्या श्रेणीत लॉन्च झाला तर हा फोन SAMSUNG Galaxy S24 FE 5G (किंमत रु. 41999) आणि Xiaomi 14 CIVI (किंमत रु. 44999) सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com