Sameer Amunekar
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा, लवकरच वनप्लसचा नवीन OnePlus 13s स्मार्टफोन लाँच होणार आहे.
OnePlus 13s फोन भारतीय बाजारात कोणत्या दिवशी लाँच होईल आणि या फोनमध्ये कोणते फीचर्स असू शकतात? जाणून घेऊया.
वनप्लसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करून, हा आगामी स्मार्टफोन ५ जून २०२५ रोजी भारतीय बाजारात लाँच होणार असल्याची माहिती दिलीय.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, OnePlus 13S मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे.
OnePlus 13S पूर्ण चार्ज केल्यावर 24 तास सतत WhatsApp कॉलिंग किंवा 16 तास इंस्टाग्राम ब्राउझिंग सहज करू शकता, असा दावा केला जात आहे.
OnePlus 13S फोन आयफोन १६ई आणि पिक्सेल ९ए शी स्पर्धा करू शकतो.